शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील ३८ अनधिकृत टेरेस हॉटेल्सला महापालिकेकडून नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:59 IST

नगररचनाचे सर्वेक्षण : अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू

ठळक मुद्देमुंबईतील आगीच्या दुर्घटनेत १४ निष्पाप जिवांचे बळी गेले होतेनाशिक शहरातही कारवाई सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली होती

नाशिक : मुंबईतील लोअर परेलमधील कमला कम्पाउंडमधील हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत हॉटेल्सविरोधी धडक मोहीम सुरू केली असताना नाशिक महापालिकेच्याही नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात नियमबाह्य अनधिकृतपणे इमारतीच्या टेरेसवर थाटलेली ३८ हॉटेल्स निदर्शनास आली आहेत. त्यानुसार, अतिक्रमण विभागाने संबंधित हॉटेल्सला नोटीसा बजावल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.मुंबईतील आगीच्या दुर्घटनेत १४ निष्पाप जिवांचे बळी गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने अनधिकृत हॉटेल्सविरोधात कारवाई आरंभली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही कारवाई सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. दरम्यान, मुंबईतील घटनेनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सहाही विभागात केलेल्या सर्वेक्षणात इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे चालविली जाणारी ३८ हॉटेल्स निदर्शनास आली आहेत. त्यामध्ये, नाशिक पश्चिम विभागातील हॉटेल प्लेअर अ‍ॅण्ड बार, एम.डी. सफायर, रूफ टेक हॉटेल,व्हायटेक्स हॉटेल अ‍ॅण्ड बार, एन्टर द ड्रॅगन, फर्माइश हॉटेल, हॉटेल पतंग, हॉटेल याहू, कोपा कबाना हॉटेल, हॉटेल मनोरथ, हॉटेल २१ सेंच्युरी, बार्बी क्यू बिस्ट्रो, हॅप्पी नाशिक टाईम्स, टॉक आॅफ दी टाऊन, डी सेलर टेरेस हॉटेल, टेरेस हॉटेल सम्राट, पंचवटी विभागातील हॉटेल न्यू पंजाब, हॉटेल प्रेस्टीज पॉर्इंट, हॉटेल मजा, हॉटेल कारवा आणि हॉटेल राऊ, सिडको विभागातील शिवसागर, सुयोग हॉटेल, साई राज दरबार, साई विजय, न्यू पद्मा हॉटेल, पाथर्डी परिसरातील हॉटेल पोर्टीको, हॉटेल हेमराज व बार रेस्टॉरंट, हॉटेल द पाल्म, हॉटेल सेलिब्रेशन, हॉटेल ग्रॅण्ड आश्विन, नाशिकरोड विभागातील हॉटेल श्रद्धा, हॉटेल नालंदा, स्कायबार आणि गायकवाड क्वालिटी फूडस्, नाशिक पूर्व विभागातील हॉटेल कामत या हॉटेल्सचा समावेश आहे. नगरपालिकेने सदर हॉटेल्सचा केलेला सर्व्हे आता अतिक्रमण विभागाकडे पुढील कार्यवाही पाठविला असून अतिक्रमण विभागानेही संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. मुदतीत संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी स्पष्ट केले आहे.स्वत:हून बांधकाम हटविण्यास सुरूवातअग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेरेसवर थाटलेल्या एकही हॉटेल्सने आग प्रतिबंधक उपाययोजनेसंबंधी परवानगी घेतलेली नाही, तर नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाही हॉटेल्सला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही. महापालिकेने आता नोटीसा बजावण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित हॉटेल्सचालकांची धावपळ उडाली असून काही चालकांनी स्वत:हून बांधकाम काढून घेण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhotelहॉटेल