शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनाच्या सहायक संचालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:28 IST

महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे.

नाशिक : महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे.महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दर मंगळवारी सुरू केलेली साप्ताहिक आढावा बैठक अचानक सोमवारी (दि.२८) घेतली. यावेळी आयुक्त गमे यांनी टपालातील प्रलंबित कामे तसेच ई-कनेक्ट अ‍ॅपमधील रेंगाळलेली कामे यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी ज्या ज्या खातेप्रमुखांकडून वेळेत कामाचा निपटारा झालेला नाही त्या सर्वांना समज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरेश निकुंभे यांना मात्र नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी कामगारनगरातील स्वागत हाईट्स या इमारतीची उंची न तपासताच पूर्णत्वाचा दाखला देण्याच्या प्रकारात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निकुंभे यांना तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र निकुंभे यांनी तो सादर केलाच नाही. महासभेत स्वागत हाईट्सचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा आयुक्तांनी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांना यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यानंतर भंदुरे रुजू झाल्यानंतरदेखील हा अहवाल प्रलंबित आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक