शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

मालेगाव महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास नोटीस

By admin | Published: March 28, 2017 1:56 AM

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या २ एप्रिल रोजी होणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे़

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या २ एप्रिल रोजी होणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे़ या मोहिमेसाठी सोमवारी (दि़ २७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत होऊन प्रथम टप्प्याचा आढावा घेण्यात आला़ पल्स पोलिओ मोहिमेत निर्धारित उद्दिष्टापैकी कमी उद्दिष्ट्यपूर्ती केल्याप्रकरणी मालेगाव महापालिकेचे अधिकारी डॉ़ डांगे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ विशेष म्हणजे या बैठकीला डांगे अनुपस्थित होते़मालेगाव महापालिका क्षेत्रामध्ये गतवर्षी १ लाख २५ हजार बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी १ लाख १६ हजार बालकांनाच  पोलिओ डोस पाजण्यात आले़ यामुळे सुमारे ९ हजार बालके या डोसपासून वंचित राहिली़ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शंभर टक्के उद्दिष्ट देण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी बैठकीत सांगितले़ दरम्यान, या बैठकीस डॉ़ डांगे हे अनुपस्थित राहिल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली आहे़ रविवारी (दि़२) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम होत असून, त्यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, नाशिक महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. होले, निवासी आरोग्याधिकारी डॉ. अनंत पवार व डॉ. खाडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी) ५४ हजार बालकांना पाजणार डोस  जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारीतील ९ तालुक्यांमध्ये ५३ हजार ९६० बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले जाणार असून, त्यासाठी १९७ बूथ तर पुढील पाच दिवसांसाठी १२६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून ८४ हजार घरातील बालकांना पोलिओचे डोस दिले जाणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ४ लाख २४ हजार बालकांचे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी सुमारे ३ हजार २१७ बूथचे नियोजन करण्यात आले आहे.