शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नॉट रिचेबल शुभांगी पाटील अखेर समोर आल्या, सांगितलं निवडणुकीचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 18:06 IST

नॉट रिचेबल असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील दुपारी विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाल्या आहेत. तसेच, आपण आपल्या उमेद्वारीवर कायम असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले. 

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरताच मुलासाठी माघार घेतली. तर सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. घडलेल्या प्रकारामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यानंतर भाजपानेही या जागेवर कुणीही उमेदवार दिला नाही. त्यातच, सकाळपासून नॉट रिचेबल असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी परत येत, आपली उमेदवारी कायम असल्याचं म्हटलं आहे. 

नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. सकाळपासून नॉट रिचेबल असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील दुपारी विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाल्या आहेत. तसेच, आपण आपल्या उमेद्वारीवर कायम असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले. 

मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला असून येत्या काळात धनशक्ती की जनशक्तीचा विजय होतो ते कळेल. मी माझ्या उमेदवारीवर कायम, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, असेही त्यांनी म्हटले. सकाळपासून नॉट रिचेबल राहण्यामागचे कारण वेळ आल्यावर सांगेल. महाविकास आघाडीवर मला पूर्ण विश्वास आहे, उद्धव ठाकरे नाना पटोलेंसह सर्वच पक्षश्रेष्ठींवर पूर्णपणे विश्वास असल्याचंही पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं. 

शुभांगी पाटील यांनी आपली उमेदवारी कायम केल्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यातच सामना रंगणार असंच दिसतंय. शुभांगी पाटील या भाजपाकडून निवडणूक लढवण्यात इच्छुक होत्या. परंतु भाजपानं उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. 

दरम्यान, अपक्ष उमेदवार धनराज विसपुतेंनी घेतली फडणवीसांची भेट धनराज विसपुते यांनीही रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. १ तास आमची चर्चा झाली. या भेटीत विसपुतेंनी भाजपाकडे पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. शुभांगी पाटील यांना अधिकृतपणे ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला नाही असा दावा नाशिकचे दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. सुभाष जंगले यांनी  अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जंगले हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकSatyajit Tambeसत्यजित तांबेElectionनिवडणूकAhmednagarअहमदनगर