शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

‘नामको’त विश्वासाची कसोटी !

By किरण अग्रवाल | Updated: December 16, 2018 01:48 IST

नाशिक मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या प्रचाराची रणधुमाळी बऱ्यापैकी जोमात आहे; पण हलाखीत असलेली बँक सुस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार याची चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या चौकशांचेच इशारे प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने रंगत वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

ठळक मुद्देबँकेचे जिल्ह्यातील आर्थिक चलनवलनातील स्थान मोठे आहे.पारंपरिक चेहरेच निवडायचे, की नवीन काही करून दाखवू शकणाºया चेहºयांना संधी द्यायची, की दोघांचा समन्वय साधायचा असा हा कसोटीचा मामला आहे.

नाशिक मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या प्रचाराची रणधुमाळी बऱ्यापैकी जोमात आहे; पण हलाखीत असलेली बँक सुस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार याची चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या चौकशांचेच इशारे प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने रंगत वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.मल्टिस्टेट शेड्युल्डचा दर्जा असलेल्या या बँकेचे जिल्ह्यातील आर्थिक चलनवलनातील स्थान मोठे आहे. सुमारे पावणेदोन लाखांवर सभासद, मतदारसंख्या असल्याने व्यापही तसा मोठा आहे. प्रारंभी व्यापाºयांची व्यापाºयांसाठी चालविली जाणारी बँक अशी तिची ओळख राहिली असली तरी, सहकाराचे क्षेत्र राजकारणापासून अस्पर्श राहू शकत नसल्याने येथेही राजकीय नेत्यांचा भरणा घडून आला आहे. अर्थात, अशाही स्थितीत गेल्या तीन-चार दशकांपासून या बँकेत ‘मामा पर्व’ अबाधित होते. हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाबाबत व कामकाजासंबंधी आक्षेप कमी नव्हते; पण तरी ते हयात होते तोपर्यंत त्यांचेच त्यात प्रस्थ होते. यंदा मोठ्या कालावधीनंतर त्यांच्याखेरीज बँकेची निवडणूक होत आहे त्यामुळेही ती उत्सुकतेची ठरून गेली आहे. बागमार मामांचा या संस्थेशी असलेला अन्योन्न संबंध पाहता, त्यांचे नाव अगर छायाचित्र प्रचारासाठी वापरण्यावरूनही आक्षेप घेतले गेले, त्यावरून त्यांच्या एकखांबी नेतृत्वाचे वलय लक्षात यावे, मात्र आता यापुढे अशा नेतृत्वासाठी कोण सक्षम अगर विश्वासू, असा प्रश्न मतदारांना पडणे गैर ठरू नये. विशेषत: बँकेचा ‘एनपीए’ वाढला असून, ती अडचणीच्या स्थितीत आहे हे काही लपून राहिलेले नाही. पुढे तर प्रशासक राजवट ओढवली होती. आता पुन्हा लोक नियुक्तांच्या हाती बँक सोपवायची तर तिला सुस्थितीत आणण्याची क्षमता कुणात आहे हे पहायला हवे. पारंपरिक चेहरेच निवडायचे, की नवीन काही करून दाखवू शकणाºया चेहºयांना संधी द्यायची, की दोघांचा समन्वय साधायचा असा हा कसोटीचा मामला आहे. बँकेत जाऊन राजकारण करू पाहणाºयांना निवडायचे, की सभासद हितासाठी रखवालदाराची भूमिका बजावू शकणाºयांना संधी द्यायची याचा फैसला विश्वासाच्याच बळावर होणार आहे. तो कुणाच्याही बाजूने होवो, बँकेला पुन्हा ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या कामी येवो इतकेच यानिमित्ताने. 

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूक