शासकीय थकबाकीदार असणाऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागणार आहे. शासनाचा कर बुडविडणाऱ्यांना निवडणुकीचा अर्ज भरता येणार नाही, अशा सूचना तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून नामांकन अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी तहसीलदार राजपूत यांनी या कक्षांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आरक्षित जागेसाठी १०० रुपये, तर खुल्या प्रवर्गातून नामांकन अर्ज दाखल करणाऱ्यांना ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ३५९ प्रभागांसाठी ३५९ मतदान यंत्रे लावण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साहित्य वाटप व स्वीकृती येथील तहसील कार्यालयाच्या आवारात केली जाणार आहे. निवडणूक खर्चासाठी जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंक शाखेत उमेदवाराचे खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इच्छुकांची दिवसभर धावपळ दिसून आली.
===Photopath===
231220\23nsk_19_23122020_13.jpg
===Caption===
मालेगावी ग्रा. पं. निवडणूक नामांकन अर्ज स्विकृती प्रक्रिया कक्षाची पाहणी करताना तहसीलदार चंद्रजीत राजपूत. समवेत निवडणूक निर्णय अधिकारी.