शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

निमाच्या इतिहासाला कलाटणी देणारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:53 IST

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनलने निवडणूक लढविण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे एकता पॅनल एकसंघ राहील की नाही? याविषयी शंकेची पाल चुकचुकत असताना पडायची ती ठिणगी पडली आणि पॅनल दुभंगले गेले. आता या फुटीचे खापर फोडण्यासाठी आरोपांचा धो-धो पाऊस नक्कीच पडणार आहे.

नाशिक : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनलने निवडणूक लढविण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे एकता पॅनल एकसंघ राहील की नाही? याविषयी शंकेची पाल चुकचुकत असताना पडायची ती ठिणगी पडली आणि पॅनल दुभंगले गेले. आता या फुटीचे खापर फोडण्यासाठी आरोपांचा धो-धो पाऊस नक्कीच पडणार आहे.  जिल्ह्यातील अग्रगण्य निमा या औद्योगिक संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत आयमा निवडणुकीचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात आयमा निवडणुकीतील तुषार चव्हाण गटाने उद्योग विकास पॅनल तयार केले आणि सत्ताधारी गोटात काहीशी अस्थिरता आली. त्यामुळे एकता पॅनलमध्ये फूट पडणार नाही याची दक्षता घेत शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. तरीही जे व्हायचे तेच झाले. ठराविक जागेसाठी पॅनलच्या नेत्यांचे एकमत होऊ शकले नसल्याने माघारीच्या दिवशी एकतामध्ये फूट पडली आणि एकताविरुद्ध एकता असे दोन गट तयार झाले.खरे तर एकतेच्या अस्थिरते मागे कोणतीही हतबलता नक्कीच नसली तरी महत्त्वाकांक्षा एकतेपेक्षा महत्त्वाची ठरली आणि रणनिती मागे पडल्याने फुटीची बीजे अधिक घट्ट रुजली गेली. अंतर्गत विषयाला चव्हाट्यावर चर्चेला वाव मिळाल्यामुळे उरलेसुरले इलाजही खुंटले आणि जी भीती काहीशी वाटत होती तीच अखेर खरी ठरली आणि निमाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. एकतामध्ये समेटासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून एक दिवसाची मुदत वाढवून घेण्यात आली होती. समेटाची जबाबदारी सुनील बागुल यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिवसभर चर्चेच्या फेरीतून काहीही निष्पन्न निघाले नाही. दोन्ही गटांचे नेते माघार घेण्यास तयार होत नसल्याने बागुल यांनाच चर्चेतून माघार घ्यावी लागली.  निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद हे मोठ्या उद्योगासाठी राखीव असून, लघुउद्योगासाठी राखीव असलेल्या उपाध्यक्षास पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद मिळत असते. त्यामुळे निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच निर्माण होत असते. या निवडणुकीतदेखील तेच घडले. सत्ताधारी एकता पॅनलकडे उपाध्यक्षपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष उदय खरोटे, सिन्नरचे विद्यमान अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, विद्यमान सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, विद्यमान सरचिटणीस श्रीकांत बच्छाव या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात बच्छाव आणि गोपाळे यांनी माघार घेतल्यानंतर नहार आणि खरोटे या दोन उमेदवारांची नावे त्यांच्या नेत्यांनी लावून धरले, तर अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी आणि के. एल. राठी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. या दोनही उमेदवारांसाठीदेखील तीच परिस्थिती निर्माण झाल्याने एकतामध्ये बेबनाव निर्माण झाला आणि ऐनवेळी एकताचे दोन पडले.निमाच्या मागील तीन निवडणुकांपासून (२०१२ पासून) निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांना रोखण्याचा प्रयत्न सत्ताधारी एकता गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे बेळे यांना थोडे लांब रहावे लागले होते. नुकत्याच झालेल्या आयमा निवडणुकीत तुषार चव्हाण यांच्या विरोधात एकता पॅनलने बेळे यांची मदत घेतल्याने निमा निवडणुकीत बेळे सक्रिय झाले आहेत. एकताच्या श्रेष्ठींच्या बैठकीत बेळे यांनी अध्यक्ष पदाचे उमेदवार के. एल. राठी आणि उपाध्यक्ष आशिष नहार यांच्या उमेदवारीवर हक्क सांगितला. यात के. एल. राठी यांच्यामुळेच बेळे यांना दुसºयांदा (२०१२-२०१३) अध्यक्षपद मिळाले असल्याने राठी यांना अध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी बेळे यांनी कंबर कसली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळेच तिसरे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी