शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

नगर परिषदेची अवाजवी घरपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:24 IST

सिन्नर नगर परिषदेने शहरवासीयांना पाठवलेली घरपट्टी अवाजवी असून, त्यात अवास्तव करांची जंत्री आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांमध्ये नगर परिषदेने २५ टक्के सवलत द्यावी. तसेच व्याज आकारणी माफ करावी, अशी मागणी सिन्नर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देतक्रार : सिन्नरला करात २५ टक्के सवलत देण्याची मागणी

सिन्नर : नगर परिषदेने शहरवासीयांना पाठवलेली घरपट्टी अवाजवी असून, त्यात अवास्तव करांची जंत्री आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांमध्ये नगर परिषदेने २५ टक्के सवलत द्यावी. तसेच व्याज आकारणी माफ करावी, अशी मागणी सिन्नर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.नगर परिषदेने २०१९ ते २०२० या वर्षीच्या घरपट्टी व नळपट्टी ग्राहकांना पाठवली आहे. घरपट्टीत अग्निशमन कर, वृक्ष कर, शिक्षण कर आदींसह इतर अनावश्यक करांचा समावेश आहे. थकीत बिलामध्ये व नियमित बिलांमध्ये व्याज आकारणी लावली आहेत. सध्या देशभर कोविडत-१९चे वैश्विक थैमान असताना संकट काळात सामान्य व मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक संकटांनी भरडलेले आहेत. एका बाजूला जगण्याची भ्रांत असताना पठाणी पद्धतीने पाठवलेली अवाजवी जाचक घरपट्टी कशी भरायची, अशा विवंचनेत सामान्य नागरिक सापडला आहे.नगरपालिकेने मूळ रकमेच्या घरपट्टीत २५ टक्के सवलत द्यावी. चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता पाणीपट्टी ३६५ दिवसांची आकारली जाते. त्यात ५० टक्के सवलत द्यावी तसेच व्याज आकारणी न करता सवलतीच्या दरात ग्राहकांकडून आकारणी करावी. तशा आशयाचा ठराव नगरपालिकेने जनरल मिटिंगमध्ये करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी किरण मुत्रक, दत्ता वायचळे, डॉ. विष्णू अत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, रवींद्र काकड, अनिल वराडे, सुभाष कुंभार, हर्षद देशमुख, कैलास झगडे, संजय काकड, डॉ. संदीप लोंढे. डी.डी. गोरडे, दत्तात्रेय डोंगरे, संजय वराडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी