शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसाची दडी : गंगापूर धरणाचा जलसाठा ७६टक्के; विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:29 IST

पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्णपणे बंद केल्याची माहिती सुत्रांनी दिली

ठळक मुद्दे गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, अंबोळी ही लहान धरणे आहेत

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. पावसाने धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्याने विसर्ग आता पुर्णपणे थांबविण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्णपणे बंद केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांनाही पाणी पुरविले जाते. हे धरण ७६ टक्के भरले असून पाण्याची आवक धरणसमुहात थांबल्याने गंगापूर धरणाचा विसर्ग पुर्णत; बंद करण्यात आला आहे. गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, अंबोळी ही लहान धरणे आहेत. या धरणांमधून गंगापूर धरणात सुरू असलेला पाण्याचा प्रवाहही पुर्णपणे थांबविला गेला आहे. काश्यपी धरण ८५ टक्के, गौतमी धरण ७१.३८ टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत २४ तासांत ०.५ मिमी. पावसाची नोंद झाली. अंबोलीच्या परिसरात १६, त्र्यंबकेश्वरमध्ये ०.२ मि.मी इतका पाऊस झाला. यावरुन पावसाचे प्रमाण अचानकपणे कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.शहर व परिसरात आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. सुर्यप्रकाशही नाशिककरांना जाणवू लागला आहे. दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास शहरात ढग दाटून येत असले तरी पावसाच्या सरींचा वर्षाव होत नाही. शहरात या हंगामात अद्याप ४३१ मि.मी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. 

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिकgodavariगोदावरी