शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या निधीतील कामांना नो एनओसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 02:18 IST

शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे.

ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांचा निर्णय : मनपा हद्दीतील पूर्वपरवानगी आवश्यक

नाशिक : शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे.शहराचे चार आमदार असून, त्यातील भाजपाच्या तीन आमदारांना शहरातच कामे करावी लागतात. राज्य शासनाच्या शहरी भागातील तीन आमदार पूर्णत: शहरी भागातील आहे. त्यामुळे त्यांना महापालिका हद्दीतच कामे करावे लागतात; परंतु शहरी भागात अशाप्रकारची विकासकामे केल्यानंतर त्याचे दायित्व महापालिकेकडे येते. एखादे समाजमंदिर किंवा व्यायामशाळेचे बांधकाम केल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्ती प्रसंगी कर्मचारी नियुक्त करण्यापर्यंतचे सर्वच काम महापालिकेला करावे लागत असते. मध्यंतरी राज्य शासनाने शहरी भागातील आमदारांना दहा कोटी रुपयांचा विशेष निधी दिल्यानंतर त्यातील पूर्व नाशिक मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत नाट्यगृह तर मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवर आकाशवाणी केंद्राजवळ तरण तलाव बांधण्याची तयारी केली होती; मात्र आयुक्तांनी अशाप्रकारची कामे विशेष निधीतून करण्यास नकार दिला.पाच तरण तलाव संचलित करणारी ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचा शेरा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडला होता. महाकवी कालिदास कलामंदिर चालविणे सोपे नसल्याने नव्या नाट्यगृहावर फुली मारली होती. त्यामुळे यातील काही नाराज आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तथापि, महापालिकेकडून अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हा निधी शासनाच्या बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्या माध्यमातून कामे करून घेण्याचा निर्णय आला. यातील तरण तलावाच्या कामाची निविदाही बांधकाम खात्याने काढली आहे.तथापि, अशाप्रकारच्या निविदा काढल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बांधकाम विभागाला महापालिकेचा ना हरकत दाखला नसताना परस्पर निविदा काढण्याबद्दल विचारणा केली आहे. महापालिकेच्या हद्दीत कामे करताना बांधकाम विभागाने प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणीतही कामे करू नये असे बजावले असून, या कामांना आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे