शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार म्हणून निवडून आल्यास राजीनामा देण्याची नाही गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:53 IST

विधानसभेच्या निवडणूक रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उडी घेतली होती. त्यात कळवण मतदारसंघातून राष्टÑवादीचे नितीन पवार, इगतपुरीतून कॉँग्रेसचे हिरामण खोसकर, दिंडोरीतून भास्कर गावित व निफाडमधून यतिन कदम या चौघांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यास त्याच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा प्रशासनाकडे देण्याची गरज नसून, अशा सदस्याचे विधिमंडळाच्या राजपत्रात नाव प्रसिद्ध होताच, त्याचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व आपोआपच रद्द होत असल्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार व हिरामण खोसकर या दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना आता राजीनामा देण्याची गरज राहिलेली नाही.

विधानसभेच्या निवडणूक रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उडी घेतली होती. त्यात कळवण मतदारसंघातून राष्टÑवादीचे नितीन पवार, इगतपुरीतून कॉँग्रेसचे हिरामण खोसकर, दिंडोरीतून भास्कर गावित व निफाडमधून यतिन कदम या चौघांचा समावेश आहे. त्यातील पवार व खोसकर हे दोन्ही निवडून आले आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये सदस्यास कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य राहण्याची मुभा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राष्टÑवादीचे सदस्य हिरामण खोसकर यांनी प्रशासनाकडे आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. आता निवडणुकीनंतर नितीन पवार यांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मात्र या संदर्भात ग्रामविकास विभागाने १९९५ मध्येच शासन आदेश काढले असून, त्यात म्हटले आहे की, विधान मंडळावर निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबाबत महाराष्टÑ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये तरतूद नाही. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्याबाबत त्याचे नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर ते आपोआप जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहण्यात निर्हत ठरतात. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार ती जागा रिक्त झाल्याबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब कळविले पाहिजे. असाच नियम पंचायत समितीच्या सदस्याबाबतही लागू असून, विधिमंडळात निवडून आल्यानंतर राजपत्रात त्यांचे नाव प्रसिद्ध झाल्यास सदस्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता यापुढे जे सदस्य निवडून आलेले नाहीत मात्र त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली अशा सदस्यांनाही आपला राजीनामा सादर करण्याची गरज राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. भारती पवार व पराभूत झालेले धनराज महाले या दोघांनीही मात्र आपले राजीनामे प्रशासनाकडे सादर केले होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद