शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषणचा शॉक! नाशिक तालुक्यातील सुमारे ६० गावं अंधारात

By संजय पाठक | Updated: June 10, 2024 17:51 IST

नाशिक शहराजवळाच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या १५० व्ही क्षमतेच्या पाॅवर ट्रान्सफर मध्ये ६ जून मध्ये बिघाड झाला होता.

महापारेषणच्या एकलहरे येथील उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये अचानक बिघाड झाल्याने सुमारे पन्नास ते साठ गावं तसेच नाशिकरोड येथील काही भागातील वीज पुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. अर्थात, दुरूस्तीचे काम सुरू असून या गावांना पर्यायी स्त्रोतांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा केला जात आहे अर्थात काही तास वीज येते आणि परत जात असल्याने या गावातील नागरीक मात्र त्रस्त झाले आहेत.

नाशिक शहराजवळाच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या १५० व्ही क्षमतेच्या पाॅवर ट्रान्सफर मध्ये ६ जून मध्ये बिघाड झाला होता.त्यानंतर उर्वरीत दोन ट्रान्सफार्मरमध्ये आज सकाळी बिघाड झाल्याने महापारेषणकडून नाशिकरोड तसेच एकलहरे परीसरातील सुमारे पन्नास ते साठ गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकलहरे येथील महापारेषणच्या केंद्रातून पंचक, मुक्तीधाम, देवळाली, भगुर, एकलहरे व सामनगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, बिघाड झाल्याने अडचण निर्माण झाली असून ४८ ते ७२ तास दुरूस्तीसाठी कालावधी लागु शकतो. त्यामुळे या भागात वीज पुरवठा बंद राहाण्याची शक्यता असल्याचे महावितरणने कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक