शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपवर  दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:17 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप १ मार्चपासून कार्यान्वित केले. या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी आखून दिला. शिवाय धोरणात्मक बाबी वगळता अन्य तक्रारी तत्काळ सोडविण्यावर भर देण्यासंबंधीचे आदेश अधिकारीवर्गाला दिल्याने त्याचा एकूणच चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत एनएमसी ई-कनेक्ट या अ‍ॅपवर ५५२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ५१९४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ३३२ तक्रारी प्रलंबित असून, त्यात अतिक्रमण विभागाच्या सर्वाधिक ८६, विद्युत विभागाच्या ४६, भटके कुत्रे/मलेरिया २६, पाणीपुरवठा २५, बांधकाम विभाग २३, मलनिस्सारण २०, उद्यान १७, नगररचना १५, पावसाळी गटार विभाग १२ या तक्रारींचा समावेश आहे. अ‍ॅपवर सर्वाधिक तक्रारी या विद्युत विभागाच्या ११८१ इतक्या प्राप्त झाल्या आहेत. त्याखालोखाल अतिक्रमण विभाग ७७९, घनकचरा व्यवस्थापन ७६२, पाणीपुरवठा ७०३, बांधकाम विभाग ५५९, भटके कुत्रे/मलेरिया ३९१, उद्यान ३३९, मलनिस्सारण ३१५, पावसाळी गटार १५१, तर नगररचना विभागाच्या ९४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आयुक्तांनी या अ‍ॅपवर येणाºया तक्रारी सोडविण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असल्याने आणि आयुक्तांकडून दर सोमवारी खातेप्रमुखांच्या होणाºया बैठकीत आढावा घेतला जात असल्याने तक्रारींचा निपटारा होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. त्यामुळे अ‍ॅपवर तक्रारी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढत चालला आहे.अ‍ॅप डाऊनलोडला प्रतिसादशहरातील ६८ हजार नागरिकांनी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले आहे. यापूर्वी, अस्तित्वात असलेले स्मार्ट नाशिक अ‍ॅप हे ५२ हजार लोकांनी डाऊनलोड करून घेतले होते. आता त्यात नागरिकांची हळूहळू भर पडत चालली आहे. प्रशासनाकडून नगरसेवकांनाही त्यांच्या तक्रारी अ‍ॅपवर मांडण्याचे आवाहन केले जात असल्याने अ‍ॅप हेच आता तक्रार सोडविण्याचे माध्यम बनू पाहत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका