शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

नितीन पवार यांची गावितांवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:30 IST

लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढून माकपच्या लालबावट्याला त्यांनी हद्दपार केले.

कळवण : लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढून माकपच्या लालबावट्याला त्यांनी हद्दपार केले.7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समतिी गणासह कळवण व सुरगाणा नगरपरिषद कार्यक्षेत्र असलेल्या कळवण विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी झालेल्या या निवडणूकीत गेल्या 5 वर्षात ठप्प झालेली विकासकामे, रस्त्यांची दुर्दशा, पाण्याची पळवापळव, जनतेची व नेत्यांची झालेली एकजूट, कांदा निर्यातबंदी व शरद पवार यांच्या भोवती फिरल्याने निकालचे आराखडे बदलले आणि राष्टÑवादीला विजय मिळाला. विद्यमान आमदार जे पी गावीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार यांच्यात खरी दुरंगी लढत झाली. अंतिम टप्प्यात नितीन पवार यांच्या विरोधात जे पी गावितांबरोबर भाजपच्या खासदार डॉ भारती पवार व त्यांचे समर्थक, डॉ जे डी पवार गट सक्रीय झाला होता. तरी राष्टÑवादीला यश लाभले.पवार यांना स्व ए टी पवारांचा वारसा कामी आला. तर विद्यमान आमदार जे पी गावीत यांच्याकडून 5 वर्षात झालेला भ्रमनिरास अडचणीचा ठरला. पहिल्या फेरीत आमदार जे पी गावित यांनी 3846 मते घेऊन आघाडी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवारांना 2719 तर युतीच्या मोहन गांगुर्डे - 930 मते मिळाली. 17 व्या फेरीपासून 25 व्या फेरीपर्यंत नितीन पवारांनी आघाडी कायम ठेवत 6596 मतांनी जे पी गावितांचा पराभव केला.विजयाची तीन कारणे...1शशिकांत पवार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, कौतिक पगार, यशवंत गवळी आदिंची मोट बांधून नाराजी दूर करण्यात यश.2स्व ए टी पवारांच्या कार्यकाळात झालेला विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात नितीन पवार यशस्वी झाले.3सुरगाणा तालुक्यात मतविभागणी झाली शिवसेनेच्या मोहन गांगुर्डे यांनी 23052 मते घेऊन जे पी गावितांना घरी बसवले आणि पवारांना यश लाभले.गावितांच्या पराभवाचे कारण...पुनंद पाणी पुरवठा योजना रद्द करण्यात व ओतूर धरणाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात 5 वर्षात आलेले अपयश कळवण शहरासह तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि तालुक्यात पाच वर्षात नजरेत भरतील अशी विकासकामे झाली नसल्याने जे पी गावित यांच्यावर कळवण तालुक्यासह विकास यामुद्द्यावर सुरगाणा तालुक्यातील जनतेची असलेल्या नाराजीतून पराभवाचे धनी व्हावे लागले.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ जिवा गावित माकप 80281२ मोहन गांगुर्डे शिवसेना 23052३ राजेंद्र ठाकरे मनसे 1157४ विजय भोये भा.ट्रा.पार्टी 806५ वामन बागुल अपक्ष 753

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalwan-acकळवणNCPराष्ट्रवादी काँग्रेसResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक