शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

शाळेच्या दिंडीत ‘निर्भया’चा सहभाग; माहितीपत्रकांद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 3:09 PM

नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच ...

ठळक मुद्देपोलीस महिलांकडून ‘निर्भया’संकल्पना समजावून दिली जात होती. छुपा कॅमेरा टवाळखोरांचा प्रताप अचूक टिपतो

नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच भागांवर सध्या ‘निर्भया’ लक्ष ठेवून आहे. निर्भयाशी अधिकाधिक महिला, युवतींनी जोडले जावे यासाठी शाळा-महाविदयलयांमध्ये पोहचवून पोलीस आयुक्तालयाच्या निर्भया पथकांकडून उपक्रम राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला पोलिसांचे निर्भया पथक क्रमांक-३ने सिडको परिसरातील जनता विद्यालयाच्या शालेय मुलांच्या दिंडीत सहभाग घेतला. दिंडीच्या माध्यमातून परिसरात फेरफटका मारून महिलांसोबत पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी संवाद साधत त्यांना माहितीपत्रके वाटप केली.

पोलीस आयुक्तालय स्तरावर महिनाभरापासून निर्भया पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या निर्भया पथकांची वाहनेदेखील साधी असून त्यांची राहणीही साधीच आहे. साध्या वेशातील या पोलीस महिला कर्मचाऱ्यांकडून महिला, युवतींची छेड काढणाºयांना धडा शिकविला जात आहे. त्यांच्याजवळ लहान आकाराचा छुपा कॅमेरा असून टवाळखोरांचा प्रताप कॅमेरा अचूक टिपतो. त्यानंतर महिला पोलीस त्या टवाळखोराला ताब्यात घेऊन त्याच्या छेड काढण्याच्या पध्दतीचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई करतात. अल्पवयीन मुले असल्यास त्यांना समज देऊन त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत समुपदेश पोलीस ठाण्यात केले जाते. तसेच काही टवाळखोर, रोडरोमीयो जे सराईत असून त्यांच्यात कुठल्याहीप्रकारे सुधारणा होणार नसल्याचे संकेत मिळाल्यास त्यांचा गुन्हेगारीचा पर्वइतिहास तपासून संबंधितांवर गुन्हेदेखील ‘निर्भया’ दाखल करते.दरम्यान, जनता विद्यालयाच्या शाळकरी आषाढी दिंडीत निर्भया पथक क्रमांक-३च्या उपनिरिक्षक छाया देवरे, तेलूरे, कावेरी गांगुर्डे आदिंनी सहभागी होऊन परिसरातून फेरफटका मारला. शाळकरी दिंडीत महिला पोलिसांचा सहभाग लक्षवेधी ठरला. दिंडीच्या अग्रभागी निर्भया पथकाची माहिती देणारा फलक विद्यार्थ्यांनी हाती धरला होता. यावेळी परिसरातील रहिवाशी महिलांना माहितीपत्रके देत पोलीस महिलांकडून ‘निर्भया’संकल्पना समजावून दिली जात होती. माहिती पत्रकांवर निर्भयाची मदत कधी, कोठे, कोणाला घेता येईल या बाबतची माहिती देण्यात आली होती. तसेच संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिला