शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

निफाडचा पारा सहा अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:57 IST

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरूवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला होता.

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरूवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला होता. ९ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. १० जानेवारी रोजी ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर१६ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आणि अवघ्या एक दिवसाच्या अंतराने सात अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊ शुक्र वारी १७ जानेवारी २.४अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली त्यामुळे कडाक्याच्या थंडीने अवघ्या निफाड तालुका गारठून गेला होता. त्यानंतर मात्र थंडीचे प्रमाण कमीकमी होत जाऊन ऊन वाढत गेल्याने उष्म्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे काही प्रमाणात उन्हाचे चटके बसू लागले होते व घराघरातील पंखे वेगाने फिरू लागले होते. परंतु १३ दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन ते चार दिवसापासून थंडी वाढत जाऊन गुरु वारी दि ३० रोजी जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला. सकाळी गार वारा सुटल्यामुळे थंडीचा सामना करावा लागला. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या बोचऱ्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांना दिवसभर स्वेटरचा वापर करावा लागला. निफाडमध्ये चहाच्या टपर्यावर गर्दी होती. सकाळी भरणार्या शाळांमध्ये विद्यार्थी शाळेत थंडीमुळे उशिरा आले. ही थंडी कांदा, गहू पिकाला पोषक ठरणार आहे मात्र या वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता वाढल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत पडले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक