शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘निपाह’मुळे नाशकात महापालिकेकडून विशेष कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:54 IST

सतर्कता : लक्षणे दिसून आल्यास वैद्यकीय तपासणीचे आवाहन

ठळक मुद्देनाशिक शहरात मोठ्या संख्येने केरळी बांधव वास्तव्यास आहेत नाशिकमधून केरळमध्ये पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या मोठी

नाशिक - केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंमुळे १३ जणांचे बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली असून जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन तथा कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.नाशिक शहरात मोठ्या संख्येने केरळी बांधव वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने, आर्टीलरी सेंटर, नोटप्रेस, गांधीनगर प्रेस या केंद्र सरकार अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमध्येही केरळी बांधव सेवेत आहेत. सध्या सुटीचा हंगाम असल्याने अनेक केरळी बांधव आपल्या प्रांतात गावी गेले आहेत. सुटीचा कालावधी संपत आल्याने परतीचा प्रवासही सुरू झालेला आहे. याशिवाय, नाशिकमधून केरळमध्ये पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या मोठी असते. केरळमध्ये प्रवास करण्याचे टाळावे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले असतानाच नाशिक महापालिकेनेही सतर्कता म्हणून जुन्या नाशकातील कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केला आहे. निपाह व्हायरसमुळे ३ ते १४ दिवसांचा ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचणी, मेंदूला सूज तसेच मांसपेशी दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सदर लक्षणे आढळून आल्यास त्यांनी कथडा रुग्णालयात विशेष कक्षात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केले आहे.घाबरण्याचे कारण नाहीमहाराष्ट सरकारकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत परंतु, नाशिक महापालिकेने सतर्कता म्हणून डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केलेला आहे. सदर व्हायरसचा महाराष्टला धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.- डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधिक्षक, मनपा

टॅग्स :NashikनाशिकNipah Virusनिपाह विषाणू