शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

नव्वद दिवसांनंतर कुणाची भरणार शंभरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:05 IST

आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त्यानंतर कुणाची शंभरी भरणार, याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सर्वांनीच धसका घेतला आहे.

नाशिक : आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त्यानंतर कुणाची शंभरी भरणार, याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सर्वांनीच धसका घेतला आहे.  तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे दि. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हाती घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी पहिले तीन महिने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजात शिस्त लावण्याबरोबरच सुधारणा करण्याचा अल्टीमेटम दिला होता. नव्वद दिवसांत कामकाजात सुधारणा न झाल्यास कर्तव्यात कसूर करणाºया अधिकारी व कर्मचारी यांना घरी पाठविण्याचाही इशारा देण्यात आला होता. सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या तीन-चार दिवसांत त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली होती. शिवाय, दफ्तर व्यवस्थित ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, गेल्या १ मे रोजी महाराष्टÑ व कामगार दिनानिमित्त राजीव गांधी भवनच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आयुक्तांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना बोलावून घेत त्यांना ९० दिवसांच्या अल्टीमेटमचे स्मरण करून दिले होते. यावेळी आयुक्तांनी झाडाझडती घेत ९० दिवसांत ज्यांच्या कामकाजात सुधारणा झालेली नसेल त्यांना घरी पाठविण्याचा इशारा दिला होता. आता आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या ९ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असून, त्यानंतर कुणावर कारवाईची कुºहाड कोसळते याविषयी महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आयुक्तांकडून धडक कारवाई केली जात असल्याने साºयाच अधिकारी व कर्मचाºयांनी धसका घेतला आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याकडील दफ्तर अद्ययावत करण्याबरोबरच प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यावर भर दिलेला आहे.कर्मचायांचे प्रशिक्षणमहापालिकेत आस्थापना विषय हाताळणाºया १०० कर्मचाºयांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. दि. ११ ते १३ मे या कालावधीत ५० कर्मचारी, तर दि. २५ ते २७ मे या कालावधीत ५० कर्मचारी यांचे निवासी प्रशिक्षण शिबिर नाशिकरोड येथील विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणारे हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाºया कर्मचाºयांच्या वेतनातून प्रशिक्षणाचा खर्च वसूल केला जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका