शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अरबाज खूनप्रकरणी नऊ संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:15 IST

तत्काळ तपासाची चक्रे फिरविली गेली. हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांच्या पथकाने मल्हारखान झोपडपट्टी भागात रात्रीउशिरापर्यंत झडतीसत्र राबविले.

ठळक मुद्देयापाठीमागे दुसरी कोणती गुंड प्रवृत्ती आहे का? नऊ संशयितांपैकी कोणाचेही नाव अद्याप जाहीर केलेले नाही.मल्हारखान झोपडपट्टी परिसरातून ताब्यात

नाशिक : जुने नाशिक परिसरातील गंजमाळ पोलीस चौकीजवळ अज्ञात हल्लेखोरांच्या टोळक्याने अरबाज पठाण नावाच्या युवकावर सशस्त्र हल्ला चढवून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील हल्लेखोरांपैकी नऊ संशयितांना मल्हारखान झोपडपट्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, किरकोळ भांडणाची कुरापत काढत हल्लेखोरांनी अरबाजवर धारधार शस्त्रांनी हल्ला रात्रीच्या सुमारास केला. या हल्ल्यात अरबाज मृत्यूमुखी पडला. याप्रकरणी तत्काळ भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी पोलीस ठाणेप्रमुखांना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शोधमोहिमेच्या सुचना दिल्या. तसेच गुन्हे शाखा युनिट-१ला देखील याबाबत सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या. तत्काळ तपासाची चक्रे फिरविली गेली. हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांच्या पथकाने मल्हारखान झोपडपट्टी भागात रात्रीउशिरापर्यंत झडतीसत्र राबविले. या दरम्यान, परिसरातून अरबाज खून प्रकरणाशी संबंधित संशयितांची धरपकड करण्यात आली. नऊ संशयितांना अटक करण्यास पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत यश आले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सशस्त्र हल्ला का केला? यापाठीमागे दुसरी कोणती गुंड प्रवृत्ती आहे का? हल्ल्यामागील नेमके कारण काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे चौकशीतून पोलिसांकडून शोधली जात आहे. या हल्ल्याची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत, याची चाचपणी पोलीस करत आहेत. नऊ संशयितांपैकी कोणाचेही नाव अद्याप पोलिसांनी अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही.

टॅग्स :Arrestअटकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनCrime Newsगुन्हेगारी