मालेगाव : तालुक्यातील गाळणे येथे मध्यरात्री पहाटे २ वाजता बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून नऊ मेंढ्या फस्त केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. आबा काळू खैरनार यांच्या मालकीच्या नऊ मेंढ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, शेतात राहणाऱ्या शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. वारंवार वनविभागाकडे तक्रार करूनही बिबट्याचा बंदोबस्त करण्यात येत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात नऊ मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:10 IST