शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतील तीन जागांसाठी नऊ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:28 IST

४ मार्चला निवडणूक : २५ जानेवारीला माघारी

ठळक मुद्देमराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी गुरूवारी (दि.१८) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती विशाल जातेगावकर यांच्या अर्जात सूचकाच्या विसंगत नावावर आक्षेप

नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून तीन जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या २५ जानेवारी रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी गुरूवारी (दि.१८) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. आॅनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. नाशिक शाखेतून नियामक मंडळासाठी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम, कार्यवाह आणि मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य सुनील ढगे, नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव, सुरेश गायधनी, नाट्यलेखक दत्ता पाटील, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सचिन शिंदे, फ्रेंडस् सर्कलचे संचालक विशाल जातेगावकर,प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शुक्रवारी अर्जाची छाननी झाली. त्यात, विशाल जातेगावकर यांच्या अर्जात सूचकाच्या विसंगत नावावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर, मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी येत्या रविवारी (दि.२१) निर्णय देणार आहेत. नाशिक शाखेचे एकूण १०५० मतदार असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून किरण येवलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठी स्थानिक स्तरावर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या २२ जानेवारीला उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून दि. २५ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहे.बिनविरोधसाठी हालचालीनाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विद्ममान पदाधिकाºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परिषदेवर जाणकार व चांगल्या माणसांना संधी दिली जाणार असेल तर आपण त्यासाठी माघार घेण्यास तयार असल्याचे प्रा. रविंद्र कदम आणि सुनील ढगे यांनी म्हटले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जयप्रकाश जातेगावकर यांना विरोध म्हणून राजेंद्र जाधव यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. आता खुद्द जातेगावकर रिंगणात नसल्याने राजेंद्र जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. नाट्यलेखक दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीने निवडणुकीतील रंगत मात्र वाढली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक