शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

वडाळ्यात पुन्हा दहा रुग्ण : शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २१४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 22:18 IST

शहरात रविवारी दिवसभरात एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील गावठाण भागासह झोपडपट्ट्यांच्या परिसरात आता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.

ठळक मुद्दे१३९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.शहरात रविवारी एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.

नाशिक : शहरात कोरोना बधितांची संख्या वाढतच असून दिवसभरात 30 संशियत रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बधितांची संख्या २१४ वर पोहोचली आहे. शहरातील वडाळागाव, शिवाजीवाडी, जुने नाशिक आणि पेठ रोड सारख्या दाट लोकवस्ती पाठोपाठ आता गंजमाळ येथे देखील कोरोना ने शिरकाव केला आहे. वडाळागावात रविवारी (दि.३१) संध्याकाळी साडेसात वाजेच्या अहवालानुसार एकूण दहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. येथील महेबुबनगर भागात सात रूग्ण तर एक ६०वर्षीय इसम झीनतनगरमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली. तसेच एक ९ वर्षीय बालिका व ५० वर्षीय पुरूष हे वडाळागावात गावठाण भागात पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच विनयनगरमध्ये एक १३ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले तर पाथर्डीफाटा येथे एका ४८ वर्षाचा पुरूष तर येथील धोंडे मळा भागात ३८ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे पेठफाटा येथील स्नेहनगरमधील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान दोन दिवसांपुर्वी मृत्यू झाला असून त्यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याचप्रमाणे नाशिकरोड येथील गोसावीवाडी मध्येही ५४ वर्षीय महिला तर अशोकामार्ग येथील एक ३९ वर्षाचा पुरूष कोरोनाबाधित आढळून आला. दिंडोरीरोडवरील कलानगरमध्येही एका ५७ वर्षाच्या महिलेला तर लेखानगरमध्ये ३० वर्षाच्या तरूणाला कोरोनाची बाधा झाली. दिवसभरात लेखानगर भागात एकूण ४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.नाशिक महापालिकेच्या हद्दीत आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ९ झाला आहे. जुन्या नाशकात एक ७६ वर्षीय वृध्द महिला पॉझिटिव्ह आढळून आली. ओम गुरूदेवनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मखमलाबादरोडवर२१ व २३ वर्षाचे युवक आणि ४६ वर्षाची महिलेला कोरोना झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. तसेच शिंगाडा तलाव येथील ड्रीम व्हॅलीमध्ये एका ४६ वर्षीय रहिवाशाला कोरोनाची बाधा झाली. पंचशीलनगरमध्ये एका ३५ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. खोडेनगर येथील एका ३८ वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच काळे चौक, वडाळानाका येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली.महापालिका हद्दीतील ६६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर १३९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. नाशिक शहरात रविवारी दिवसभरात एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील गावठाण भागासह झोपडपट्ट्यांच्या परिसरात आता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.शहरातील बधितांची संख्या वाढत असून त्यांच्या संपर्कात असलेल्या संशियत रु ग्णांना कोरंटाईन करावे लागत असल्याने मनपाला आता अधिक जागेची गरज लागणार आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाचे वसतिगृह ताब्यात घेऊन 450 संशियत रु ग्ण तेथे ठेवण्यात येणार आहे . समाज कल्याण खात्याने त्यास मान्यतादेखील दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या