शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:14 IST

झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्पचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये सोमवारी (दि़२३) घडली़ आराध्या योगेश खाडपे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

नाशिक : झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्पचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये सोमवारी (दि़२३) घडली़ आराध्या योगेश खाडपे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.  गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या शिवाजीनगरमधील समर्थ रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये योगेश खाडपे हे पत्नी व नऊ महिन्यांची मुलगी आराध्यासह राहतात़ सोमवारी (दि़२३) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मनीषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हीस घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले. मुलगी झोळीतून ती खाली पडू नये या काळजीने त्यांनी झोळीला स्कार्पने बांधला व त्यानंतर घरकामामध्ये व्यस्त झाल्या़  या दरम्यान, चिमुकली आराध्या ही झोळीतून सरकत-सरकत खाली असता, झोळीला बांधलेल्या स्कार्प तिच्या गळ्याभोवली अडकून तिला गळफास बसला़ ही बाब आई मनीषा खाडपे यांच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. योगेश खाडपे यांनी बेशुद्ध अवस्थेतील आराध्यास दुपारी ३ वाजेच्या सुमारास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी फास बसून गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले़  याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  दरम्यान, यापूर्वीही नाशिक शहरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्यांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत़ लहान मुले खेळत असताना वा झोपलेले असताना घरातील सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे़नाशिक शहरातील दुर्दैवी घटना१० आॅगस्ट २०१७सिडकोत आठ महिन्यांच्या वीर जयस्वाल या चिमुकल्याचा घशात फुगा अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली होती़३० जानेवारी २०१८अशोकामार्गावर बाल्कनीतून पडल्याने चार वर्षांच्या हसनेन मोईन सय्यद या एकुलता एक मुलाचा मृत्यू .५ फेब्रुवारी २०१८चांदगिरी येथील चार वर्षीय मुलगी शालिनी हांडगे हिने १० रूपयाचे नाणे गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू .१६ फेब्रुवारी २०१८सिडकोत एक वर्षीय सुजय बिजुटकर याच्या घशात हरभऱ्याचा दाणा अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना .

टॅग्स :Deathमृत्यू