शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साडे नऊशे रूग्णांनी घराचे केले रूग्णालयात रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:31 IST

नाशिक- बेडसची वेळीच न होणारी उपलब्धता आणि अन्य अडचणींमुळे आता कोरोना बाधीत घरच्या घरीच स्वतंत्र राहूून उपचारावर भर देत आहे. ...

ठळक मुद्देगृहविलगीकरण: वैद्यकिय सल्ल्याने उपचार

नाशिक- बेडसची वेळीच न होणारी उपलब्धता आणि अन्य अडचणींमुळे आता कोरोना बाधीत घरच्याघरीच स्वतंत्र राहूून उपचारावर भर देत आहे. सध्या शहरात साडे नऊशे नागरीकांनी घरीच रूग्णालयाप्रमाणे राहून उपचार सुरू केली आहे.वैद्यकिय नियमानुसार गृह विलगीकरणाची सोय असली तरी बहुतांशी नागरीकांनी नाईलाजामुळे हा पर्याय स्विकारला आहे. ्रकोरोनाचे संकट आढळल्यानंतर सुरूवातील एक रूग्ण सापडला तरी त्याला विलगीकरणात ठेवले जात असे. रूग्णालयात वैद्यकिय उपचार देतानाही स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले होते. त्यावेळी संसर्ग टाळण्यासाठी हा एक पर्याय होता. नंतर मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरचे नियम वेळोवेळी बदलण्यात आले. त्यानंतर ज्यांच्याकडे घरातच स्वतंत्र राहण्यासाठी खोली असेल आणि त्याला अ­ॅटेच प्रसाधन गृह असेल अशा रूग्णांनाच गृहविलगीकरणासाठी परवानगी देण्यात आली. शहरात जुलै महिन्यापासून रूग्णसंख्या वाढत गेली. त्यानंतर देखील महापालिकेने वडाळा, शिवाजीवाडी, फुले नगर आणि क्रांती नगर या भागात रूग्ण संख्या वाढली तरी गरजेनुसार कोविड सेंटर तयार केले. परंतु दाट वस्तीत संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन त्यांना गृहविलगीकरणास परवानगी दिली नव्हती. आता मात्र,नागरीक सर्रास गृहविलगीकरणाचापयार्य निवडत आहेत.मध्यंतरी महापालिकेने प्रभागाप्रभागात राबवलेल्या अ­ॅँटीजेन चाचण्यानंतर रूग्ण संख्या इतकी प्रचंड वाढली की, रूग्णालयात जागा मिळणे कठीण झाले. आर्थिकदृट्या परवडेल त्याला खासगी रूग्णालय आणि गोरगरीबांना महापालिकेचे रूग्णालये असा पर्याय तयार करण्यात आला. तथापि, आता आर्थिक सधन वर्ग किंवा तीव्र लक्षणं असलेले रूग्ण वगळले तर अनेक रूग्णांनी गृहविलगीकरणाचाच पर्याय निवडला आहे. रूग्णालयातील अडचणींपेक्षा घरीच उपचार करण्यावर भर दिला जात आहे. अनेक खासगी डॉक्टर्स देखील यासंदर्भात मार्गदर्शन करून गृहविलगीकरणातील रूग्णांना उपचार करण्यास मदत करीत आहेत.नाशिक विभागातील पाच जिल्'ांचा विचार केला तर सध्या ३३ हजार २५७ रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. नाशिक जिल्'ातील ९५० रूग्णांचा त्यात समावेश आहे.तर धोकादायक ठरू शकतेगृहविलगीकरणात कुटूंबियांना संसर्ग होऊ न देण्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य नियमांचे पालन आवश्यक आहे. मात्र, गृहविलगीकरणाचे नियम धाब्यावर बसवून अनेक बाधीत शहरात फिरत असल्याने संसर्ग वाढू शकतो. महापालिकेने आताहातावर कोरंटाईनचे शिक्के मारणे बंद केल्याने बाधीताला ओळखणे कठीण झाले आहे. मालेगाव येथे गृहविलगीकरणात असलेले रूग्ण बाहेर फिरताना आढळले आहेत.यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी (दि.१३) मालेगाव येथे बैठक घेतली आणि गृहविलगीकरणातील बाधीत रस्त्यांवर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHomeघर