शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निमाकडून पूरग्रस्तांसाठी पंधरा लाखांचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:37 IST

सात पूर : जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हा पूर व अन्य जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली असल्याने ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली असल्याने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून निमाच्या वतीने सुमारे १५ लाख रुपयांचा निधी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला.

सातपूर : जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली असल्याने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून निमाच्या वतीने सुमारे १५ लाख रुपयांचा निधी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत महापुराने थैमान घातले असून, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांमध्ये अनेक पूरग्रस्त विविध जीवनावश्यक सुविधांपासून वंचित आहेत. शासकीय व विविध स्तरावर मदतीचा ओघ सुरू असून, नाशिकमधीलनाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) ही औद्योगिक संघटनादेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहे. सामाजिक जाणीव व मानवतावादी दृष्टिकोन जोपासत निमाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनास १४ लाख २६ हजार २४८ रु पयांचा निधी सुपूर्द केला.राज्य शासनातर्फे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांना सदर मदतीचा धनादेश निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाच्या औद्योगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, कार्यकारिणी सदस्य संजय महाजन यांच्या शिष्टमंडळातर्फे मुंबई येथे मंत्रालयात सादर करण्यात आला. निमातर्फे प्रदान करण्यात आलेल्या अर्थसहाय्याबाबत उभय मान्यवरांनी प्रशंसा व्यक्त केली. सदर नैसर्गिक आपत्तीत विस्कळीत झालेले जीवनमान पूर्ववत व्हावे यासाठी होत असलेल्या प्रयत्नांत निमा सदैव शासनासोबत असल्याचा विश्वास यावेळी निमा शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिला. निमा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली व विविध औद्योगिक विषयांवर चर्चा केली.

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूर