शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारण कक्ष स्थापनेसंदर्भात शून्य कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:05 IST

दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : नागरिकांना मदतीची प्रतीक्षा

नामदेव भोर। नाशिक : जिल्ह्णात दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह दुष्काळग्रस्त भागातील नागरिक जिल्हा परिषदेकडून मिळणाºया मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य शासनाने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी व चाºयाचा प्रश्न बिकट होत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्षच्या घोषणेशिवाय अन्य कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे जिल्हा परिषद सत्ताधारी आणि प्रशासनाची ग्रामीण भागातील प्रश्नांसंबंधी असलेली उदासीनता समोर आली आहे.दुष्काळ घोषित झालेल्या आठ तालुक्यांशिवाय पश्चिम भागातील तालुक्यांतील पिके वाया गेलेली असल्याने या तालुक्यांमध्येदुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हापरिषद अध्यक्ष शीतल सांगळेयांनी जिल्हा परिषद अंतर्गत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले.परंतु, स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्षाच्या निर्मितीविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने दुष्काळग्रस्तांची ही अपेक्षा फोल ठरली असून, जिल्ह्णातील दुष्काळग्रस्त जिल्हा परिषदेतर्फे दुष्काळ निधीतून मदत मिळण्याच्या प्र्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यातील शेतक ºयांनानुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसह चारा छावणी अथवा जनावरांच्या संगोपणासाठीजिल्हा परिषदेकडून ठोस मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदdroughtदुष्काळ