शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाईक संस्थेची मतदार यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:48 IST

जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमाकांची मोठी शिक्षण संस्था असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ हजार ६९४ मतदारांची अंतिम यादी शनिवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमाकांची मोठी शिक्षण संस्था असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ हजार ६९४ मतदारांची अंतिम यादी शनिवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक मतदार यादीवर तीन दिवसांत आलेल्या १०९ हरकतींवर निवडणूक मंडळाने निर्णय देऊन पत्ता व नावात बदल केले असून, मयत सभासदांच्या प्राप्त मृत्यू दाखल्यांची पडताळणी करून ८० सभासदांची नावे कमी करण्यात आली असून, प्राथमिक यादीत आणखी मतदारांची नावे वाढली असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासह चार पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी संस्थेचे आठ हजार ७७२ मतदारांची प्रारुप यादी सोमवार, दि. २४ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. या यादीवर गुरुवारपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी निवडणूक मंडळाने सर्व प्राप्त १०९ सभासदांच्या मतदार यादीतील नावात तसेच पत्त्यात बदल करण्याच्या अर्जांवर निर्णय घेऊन हे बदल केले आहेत. त्याचप्रमाणे ८० सभासदांचे मृत्यू दाखलेही निवडणूक मंडळाला प्राप्त झाले होते. या मयत सभासदांची नावेही या यादीतून वगळण्यात आली आहेत. तर सभासद नोंदवहीत नावे असतानाही मतदार यादीत चुकून वगळल्या गेलेल्या नावांचा तसेच १९९९ मध्ये मतदार यादीत होते, परंतु २०१४ च्या यादीत वगळले होते त्या नावांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे मतदार यादीविषयी प्राप्त अधिकृत माहितीच्या आधारे निवडणूक मंडळाने एकूण ८६९४ मतदारांची यादी जाहीर केली असून, हे सर्व मतदार नाईक शिक्षण संस्थेचे येणाºया पाच वर्षांसाठी कारभारी निवडणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक