शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

येत्या दोन वर्षांत रायगडावर ३२ मण सोन्याचे सिंहासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:29 IST

शिवभक्तीची ही ज्योत ज्वलंत ठेवण्यासाठी प्रत्येक शिवभक्तांच्या मनात असलेलं छत्रपतींचे ३२ मण सोन्याचं सिंहासन येत्या दोन वर्षांत रायगडावर पुन्हा प्रस्थापित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. 

ठळक मुद्देसंभाजी भिडे : नाशकातील कार्यक्रमात प्रतिपादन

नाशिक : शिवभक्तीची ही ज्योत ज्वलंत ठेवण्यासाठी प्रत्येक शिवभक्तांच्या मनात असलेलं छत्रपतींचे ३२ मण सोन्याचं सिंहासन येत्या दोन वर्षांत रायगडावर पुन्हा प्रस्थापित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. राजीवनगर येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भिडे गुरुजी यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र हा प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या जीवनाचा श्वास बनला पाहिजे, असे सांगितले. सध्याच्या पिढीतील बहुतांश जणांनी संपूर्ण शिवचरित्र, महाभारत, रामायण वाचलेले नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.  त्यामुळेच शिवाजीराजे सर्वांना समजावून सांगण्यासाठी त्यांचे चरित्र वाचन करण्याचा संकल्प प्रत्येक युवकाने करावा, असेही त्यांनी नमूद केले.  आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला जर खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला रामायण, महाभारत, मराठ्यांचा ज्वलंत इतिहास आणि संस्कृत भाषेचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे भिडे गुरुजींनी सांगितले. यावेळी गडकोट मोहीम, तसेच त्यानंतर आपापल्या भागात घरोघरी जाऊन शिवछत्रपतींच्या सिंहासनासाठी निधीसंकलन करण्याच्या कार्याचा संकल्प करण्यात आला. जगणे आणि मरणे शिकविले शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आणि स्वधर्मासाठी कसे जगावे याची शिकवण दिली आहे, तर धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांच्या मरणातून कितीही हाल  झाले तरी स्वधर्मासाठी कसे मरावे याची शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. त्यामुळे या दोघांचे जीवनचरित्र नित्य स्मरणात ठेवावे, असेही भिडे यांनी नमूद केले.

टॅग्स :NashikनाशिकSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी