शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानपत्रे व्हायरसमुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:50 IST

नाशिक : वर्तमानपत्राद्वारे कोरोना पसरत नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याने त्याविषयी शंका बाळगण्याची गरज नसून वाचकांनी व्हायरसमुक्त आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रे वाचनाची भूक निर्धास्तपणे भागवावी, असे स्पष्टीकरण जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टरांनी दिले आहे.

ठळक मुद्देमान्यवर डॉक्टरांचे स्पष्टीकरण : वाचकांनी निर्धास्त राहावे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वर्तमानपत्राद्वारे कोरोना पसरत नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असल्याने त्याविषयी शंका बाळगण्याची गरज नसून वाचकांनी व्हायरसमुक्त आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रे वाचनाची भूक निर्धास्तपणे भागवावी, असे स्पष्टीकरण जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टरांनी दिले आहे.यासंदर्भात आपले मत व्यक्त करताना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्र व्हायरसमुक्त असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. तरीदेखील छपाईपासून वितरकांपर्यंत पोहोचेपर्यंत ‘लोकमत’ वर्तमानपत्र सॅनिटाइज केले जाते आणि त्यानंतर वाचकांपर्यंत नेण्यासाठीही आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे वाचकांनी निर्धास्त होऊन वृत्तपत्र वाचनाची आपली सवय जपणे गरजेचे आहे, असे डॉ. महाले यांनी सांगितले.येवला येथील शाह हॉस्पीटल अ‍ॅण्ड क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. स्वप्नील शाह यांनी सांगितले की, गर्दीत जाणे टाळून तसेच शारीरिक अंतर राखत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत काळजी घेतली तरीदेखील आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रातून विशेषत: ‘लोकमत’मधून नेहमीच सकारात्मक, प्रबोधनपर व लोकहिताची वृत्ते प्रसिद्ध होत असतात. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत असणारे संभ्रम, अज्ञान दूर करण्यात ‘लोकमत’चा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत वर्तमानपत्रामुळे कोराना झाल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. सर्व नियम पाळून, सॅनिटाईज होऊन वर्तमानपत्र वाचकांपर्यंत येत असते. त्यामुळे विश्वासार्ह माहितीसाठी वर्तमानपत्र वाचले पाहिजे, असे येवला येथील डॉ. स्वप्नील शाह यांनी नमूद केले.महत्त्वाचा दस्तावेजजगातील घटना, घडामोडींची वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी वर्तमानपत्रे पार पाडत आहेत. तसेच वृत्तपत्र हा महत्त्वाचा दस्तावेज असल्याने तो संग्राह्यही ठेवता येतो. वृत्तपत्र समाज शिक्षणाचे साधन असून, यामुळे त्याची विश्वासार्हता टिकून आहे. परिणामी आजही घरोघर वाचकांनी वृत्तपत्र वाचणे आवश्यक आहे, असे डॉ. हितेश महाले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या