शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना न्यू इयर गिफ्ट! गोवा-आमदाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 11:06 IST

आता नाशिककरांना न्यू इयर गिफ्ट मिळाले आहे.

संजय पाठकनाशिक- दिवाळी दरम्यान बंद पडलेल्या विमान सेवांमुळे नाराज झालेल्या नाशिककरांना आता विमान कंपन्यांनी न्यू इयर गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरु होऊन बंद पडलेल्या काही सेवा पुन्हा सुरू होणार असून इंडिगो या आघाडीच्या कंपनीनेदेखील नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून स्पाइस जेटच्या हैदराबाद आणि दिल्ली या दोनच विमान सेवा सुरू आहेत. आता या कंपनीने समर शेड्युलमध्ये अहमदाबाद-गोवा-बंगळुरू या आणखी तीन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर इंडिगो या महत्त्वाच्या विमान कंपनीने नागपूर- हैदराबाद गोवा आणि अहमदाबाद अशा चार शहरांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांनी तसा प्रस्ताव डीजीसीएला सादर केला आहे. स्टार एअर या कंपनीने नाशिक-बेळगाव ही बंद केलेली विमान सेवा फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुकिंग सुरू झाले आहे.

नाशिकच्या ओझर विमान तळावरून विमानसेवा जोमाने सुरू असताना मध्यंतरी काही विमानसेवा बंद पडल्यामुळे नागरिकांची नाराजी होती. मात्र आता नाशिककरांना न्यू इयर गिफ्ट मिळाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकahmedabadअहमदाबादBengaluruबेंगळूर