नवलेखकांना प्रोत्साहान देणे गरजेचे : ॲड.शशिकांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:37+5:302021-03-08T04:15:37+5:30

भाषिक कौशल्ये विकास , व्यावहारिक व उपयोजित मराठी पुस्तकाचे प्रकाशन कळवण -नवलेखकांना प्रोत्साहान दिल्यास त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्यकृती आकारास ...

New writers need to be encouraged: Adv. Shashikant Pawar | नवलेखकांना प्रोत्साहान देणे गरजेचे : ॲड.शशिकांत पवार

नवलेखकांना प्रोत्साहान देणे गरजेचे : ॲड.शशिकांत पवार

Next

भाषिक कौशल्ये विकास , व्यावहारिक व उपयोजित मराठी पुस्तकाचे प्रकाशन

कळवण -नवलेखकांना प्रोत्साहान दिल्यास त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्यकृती आकारास येतील त्यामुळे नवलेखकांना प्रोत्साहान देणे गरजेचे असल्याची भावना कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.शशिकांत पवार यांनी व्यक्त केली.

कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित , कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने प्रा.पंकज पवार लिखित भाषिक कौशल्ये विकास , व्यावहारिक व उपयोजित मराठी या पुस्तकाचे प्रकाशन आणि ॲड.शशिकांत पवार यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बेबीलाल संचेती प्रमुख अतिथी म्हणून विश्वनाथ व्यवहारे , राजेंद्र भामरे , मुख्याध्यापक एल डी पगार , प्राचार्य डॉ.बी. एस . पगार , उपप्राचार्य प्रा.आर.जे.कापडे , प्रा.आर.बी.आहेर , प्रा.एस.एम.पगार , डॉ.यु.के.पवार , प्रा.बोरसे , पाटील , पगार , मांडे , निकम आदी उपस्थित होते.

Web Title: New writers need to be encouraged: Adv. Shashikant Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.