शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

नवीन वाळू धोरण शासनाच्या मुळाशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:07 IST

पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच बेकायदेशीर वाळू उपसाला निर्बंध घालण्यासाठी शासनाने तयार केलेले नवीन वाळू धोरण शासनाच्याच मुळाशी उठले असून, पर्यावरण समिती, भूजल सर्वेक्षण व महसूल अशा तिन्ही विभागांच्या वेगवेगळ्या नियम, निकषांमुळे ठिय्यांमधून वाळू उपसा करणे दुरापास्त तर झालेच, परंतु नियमात बसू पाहणाऱ्या वाळू ठिय्यांच्या लिलावासाठी शासनाने केलेल्या कडक धोरणामुळे ठेकेदारांनीही लिलावाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाळूपासून दरवर्षी मिळणाºया कोट्यवधींच्या महसुलाला शासनाला मुकावे लागले आहे.

ठळक मुद्देवाळू पट्ट्यांकडे ठेकेदारांची पाठ; फेरलिलावाची नामुष्की

श्याम बागुल।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच बेकायदेशीर वाळू उपसाला निर्बंध घालण्यासाठी शासनाने तयार केलेले नवीन वाळू धोरण शासनाच्याच मुळाशी उठले असून, पर्यावरण समिती, भूजल सर्वेक्षण व महसूल अशा तिन्ही विभागांच्या वेगवेगळ्या नियम, निकषांमुळे ठिय्यांमधून वाळू उपसा करणे दुरापास्त तर झालेच, परंतु नियमात बसू पाहणाऱ्या वाळू ठिय्यांच्या लिलावासाठी शासनाने केलेल्या कडक धोरणामुळे ठेकेदारांनीही लिलावाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाळूपासून दरवर्षी मिळणाºया कोट्यवधींच्या महसुलाला शासनाला मुकावे लागले आहे.जिल्हा प्रशासनाने सात वाळू ठिय्यांसाठी ई-आॅक्शन म्हणजेच लिलाव काढले असता त्यासाठी एकही ठेकेदार पुढे न आल्याने दोन कोटी रुपयांचे महसूूल बुडाले आहे. वाळूचा बेसुमार होणारा अनधिकृत उपसा व माफियागिरीला चाप लावण्यासाठी सरकारने नवीन वाळू धोरण तयार करून त्यात अधिकाधिक पारदर्शकता व वाळूचोरी रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी अटी-शर्तींचा समावेश केला आहे. विशेष करून ज्या ठिकाणी वाळूचा साठा असेल त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव वाळू उपसासाठी आवश्यक करण्यात आला असून, वाळूची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र रस्ता, वाळू लिलावातून ग्रामपंचायतींना विकास निधी, वाळू ठिय्या व उपसा केलेल्या वाळूच्या साठ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएसप्रणाली यांसह अनेक बाबींचा त्यात समावेश करण्यात आला असून, पूल, मोरी या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरापर्यंत वाळू उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय वाळू ठेकेदारांची लिलावासाठी रिंग होऊ नये म्हणून ‘ई-आॅक्शन’ लिलाव सुरू केले आहेत. त्यामुळे उपरोक्त नियम, निकषांचा विचार करता वाळू ठिय्यांचा अधिकृत लिलाव घेण्यापेक्षा, ग्रामस्थ, महसूल व पोलीस यंत्रणेशी संगनमत करून बेकायदेशीर वाळू उपसावरच माफिया अधिक भर देत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून वाळू ठिय्यांच्या लिलावापासून मिळणाºया उत्पन्नात कमालीची घट होत आहे. त्यातच आता शासनाने वाळू उपसाचे मायक्रोप्लॅनिंग करण्याचे नवीन धोरण स्वीकारल्यामुळे तर आणखीच गुंतागुंत निर्माण झाली आहे. पर्यावरणाशी संबंधित काम करणाºया मान्यताप्राप्त संस्थेकडून वाळू ठिय्याचे तांत्रिकदृष्ट्या मायक्रोप्लॅनिंग करून घेण्याच्या शासनाच्या सूचना आहेत व अशाप्रकारचा एका ठिय्याचा आराखडा तयार करण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार रुपये खर्च असून,तो कोणी करायचा हा कळीचा मुद्दा आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने काही ठेकेदारांना हाताशी धरून सात वाळू ठिय्यांचे मायक्रोप्लॅनिंग करून घेऊन त्याच्या लिलावाची प्रक्रिया राबविली, परंतु शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत टेंडर भरण्याच्या मुदतीत एकाही ठेकेदाराने बोली न लावल्याने सात ठिय्यांचा लिलाव रद्द करण्यात आला आहे.ठिय्यांच्या लिलावाची चिंतानाशिक जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या त्र्यंबक, निफाड, दिंडोरी, देवळा, बागलाण व मालेगाव या पाच तालुक्यांतील सात ठिय्यांचे लिलाव बारगळल्यानंतर फेरलिलावाची नामुष्की शासनावर ओढवली असून, पुढच्या टप्प्यात आणखी दहा ठिय्यांचे लिलाव केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातच ठेकेदार पुढे न आल्याने यापुढच्या लिलावासाठी कोणी पुढे येईलच याची कोणतीही शाश्वती अधिकाºयांना राहिलेली नाही. गेल्या वर्षीही जवळपास १४ ठिय्यांचे अखेरपर्यंत लिलाव होऊ शकले नव्हते.

टॅग्स :Governmentसरकारsandवाळू