भगूर : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लॅमरोड सहा नंबर नाका ते देवळाली कॅम्प येथील ग्रीनवूड सोसायटीपर्यंत दोन किलोमीटरचे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने छावणी परिषदेचे अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सहा नंबर नाका ते देवळाली कॅम्प ग्रीनवूड सोसायटीपर्यंत साडेतीन कोटी रुपये खर्च करून सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण व दुभाजकाचे काम करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, दुभाजक व पथदीप उभारण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे.पावसाळा सुरू होताच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची वाताहत झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डांबर वाहून गेल्याने सदर रस्त्याचे काम निकृष्टरीत्या करण्यात आलेले आहे.सदर कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे देवळाली कॅम्प अध्यक्ष सुभाष बोराडे, गौतम पगारे, रवींद्र गायकवाड, राजेश पवार, बिपीन गांगुर्डे, राजेंद्र जाधव, रवींद्र शिरसाठ, नीलेश कांबळे, प्रशांत गांगुर्डे, सचिन भालेराव, राजेंद्र कांबळे, बाळू दोंदे, चेतन जाधव, महेंद्र बोराडे आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
नव्या रस्त्यावर पडले खड्डे
By admin | Updated: August 1, 2015 23:00 IST