शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेचा नवीन आकृतीबंध लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:45 IST

रणजित पाटील : आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

ठळक मुद्देआस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आणि शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधावर चर्चा मंजूर पदांमधील रिक्त पदांबाबत आयुक्तस्तरावर शासनाची मान्यता घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदे भरता येऊ शकतात

नाशिक - नाशिक महापालिकेने शासनाकडे पाठविलेला नवीन ७६५६ पदांचा आकृतीबंध मार्गी लावण्यासाठी येत्या सात ते दहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. त्यासाठी विशेष बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृह आणि नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात रणजित पाटील यांनी गुरूवारी (दि.१५) शहरातील शासनाकडे असलेल्या प्रलंबित प्रश्नांसंबंधीचा आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सांगितले, बैठकीत आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आणि शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधावर चर्चा झाली. येत्या सात ते दहा दिवसात त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. मंजूर पदांमधील रिक्त पदांबाबत आयुक्तस्तरावर शासनाची मान्यता घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदे भरता येऊ शकतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीत, रस्त्यांची कामे, एलईडी, आरोग्य, स्मार्ट सिटी, मलनि:स्सारण या प्रश्नांवरही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पाणी, सांडपाणी व कचरा यांचे जोपर्यंत सुयोग्य नियोजन होत नाही तोपर्यंत स्मार्ट सिटीला दिशा मिळणार नाही. त्यामुळे, या प्रश्नांकडे लक्ष पुरविले जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, बैठकीत महापौर रंजना भानसी, सभागृहनेता दिनकर पाटील यांनी काही सूचना मांडल्या. त्यात प्रामुख्याने, ६ आणि ७.५० मीटर रस्त्यालगत बांधकामांना टीडीआर व प्रीमिअम लागू करणे, वैतरणा जलविद्युत प्रकल्पातील पाणी मुकणे धरणात सोडणे, गंगापूर धरणात रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अनुदान देणे, महापालिकेच्या खुल्या जागांवरील दहा टक्के जागेत धार्मिक स्थळ उभारण्यास परवानगी देणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सफाई कामगारांची भरती, खेडे विकास निधी, स्मार्ट लायटींग प्रकल्प आदी मुद्यांचा समावेश होता. यावेळी, आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही शाासनाकडे प्रलंबित असलेल्या आस्थापना आराखड्यासंबंधी चालना देण्याची विनंती केली. बैठकीला, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार आदी उपस्थित होते.काय आहे आकृतीबंध?महापालिकेने आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील मंजूर पदांचा व नव्याने आवश्यक असलेल्या पदांचा आढावा घेऊन आकृतीबंध तयार केला असून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. या आकृतीबंधानुसार महापालिकेत ७६५६ नवीन पदे प्रस्तावित करण्यात आली असून या पदांना मंजुरी मिळाल्यास महापालिकेतील आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदसंख्या ७०९० वरून १४ हजार ७४६ होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका