सिडको : नाशिक येथील न्यू हरी ओम अहिर सुवर्णकार वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांच्या मठात सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी सोनार महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे कृष्णा बागुल व हरिओम सांस्कृतिक संस्थेचे माजी अध्यक्ष गोपाळ खरोटे यांच्या हस्ते श्री संत गाडगे महाराज व संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी हेमंत ओझरकर यांनी सांगितले की, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणावे आपुले या उक्तीप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून गोरगरीब बांधवांना मिष्टान्न भोजन देण्यात येते. संतांनी दिलेली शिकवण आचरणात आणून समाज प्रबोधनाचे काम आपण एकत्र येऊन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत संचालक गणेश विखनकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश्वर थोरात यांनी केले. यावेळी कार्यक्रमास रत्नाकर विसपुते, सुनील दुसाने, प्रा. उल्हास वानखेडे, ज्योतिषतज्ज्ञ मुकेश दंडगव्हाळ, सुनील घोडके, स्वप्नील वडनेरे, अनंतराव ओझरकर, विक्रांत देवरे, भुपेंद्र भामरे व समाज बांधव उपस्थित होते.
न्यू हरी ओम अहिर सुवर्णकार वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने नरहरी महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:18 IST