नाशिक : नाशिक सिनर्जी राऊंड टेबल २४५ ची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रतीक भारद्वाज, सचिवपदी शाश्वत जोहरी, खजिनदारपदी निशिद जव्हेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी राऊंड टेबल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष विनित पारेख तसेच एरिया क्रमांक-३ चे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल, विभागीय सचिव हितेश केरिंग, नाशिक राऊंड टेबल १०७ चे अध्यक्ष साकेत जोहरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर ललवाणी यांनी केले. यावेळी करण हंडा, उत्कर्ष बेदमुथा, तेजस चव्हाण, चिराग बटाविया, समीर ललवाणी, मनीष आचरा, रिषी लुथरा, अंशुल अग्रवाल, अमोल मिश्रा, गोपाल कुकरेजा आणि प्रशांत दुधेडिया यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली....छायाचित्र...आरच्या फोटोवर सिनर्जी नावाने सेव्ह आहे.
सिनर्जी राऊंड टेबलची नवी कार्यकारिणी
By admin | Updated: May 15, 2014 00:35 IST