लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्ट्रीय स्तरावर अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘नेट’चे परीक्षा केंद्र नाशिकमध्ये सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील जवळपास २० हजारावर विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये जावे लागत होते. या विद्यार्थ्यांची नाशिकमध्ये नेट परीक्षा केंद्र सुरू होणार असल्याने प्रवासाच्या त्रासातून सुटका होणार आहे. ‘नेट’ परीक्षेची वेळ सकाळी ९ वाजेची असते तर परीक्षाकेंद्रावर अर्धातास अगोदर म्हणजेच ८.३० वाजताच हजर राहाण्याचेही यूजीसीचे आदेश आहे. त्यामुळे सकाळी चार-सहा तास प्रवास करु न परीक्षेला वेळेत पोहचेल की नाही याची, विद्यार्थ्यांना शाश्वती नसल्याने हा धोका टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळीच मुक्कामाच्या हेतुनेच परीक्षेसाठी जावे लागत होते. तेथे मुक्कामाची योग्य व्यवस्था होत नसल्याने प्रसंगी प्लँटफॉर्म किंवा फुटपाटवरच राहाण्याची वेळ येते असे, अनेकादा विद्यार्थ्यांची त्यामुळे मानिसकता बिघडते असे. परिणामी विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे पेपरही लिहू शकत नव्हते.हजारो रु पये खर्चून आर्थिक भुर्दंड सोसूनही उपयोग होत नसल्याने विद्यार्त्यांर्थ्यांमध्ये नाशिकमध्ये नेट परीक्षा कें द्र व्हावी यासाठी मागणी होत होती. ही सर्व अडचण लक्षात घेता नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र नेट परीक्षा केंद्र सुरु करणेसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे निवेदन दिले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१७)केंद्रीय माध्यमिक शिक्षा केंद्र या विभागाने नाशिक येथे नेट सेंटरसाठी परवानगी दिली असून ५ नोव्हेंबर २०१७ रोजी भारतभरातील ९० मोठया शहरांबरोबर नाशिकमध्येही नेट परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून होतकरू विद्याथ्यांना या सेंटरमुळे न्याय मिळणार असल्याचा विश्वास गोडसे यानी व्यक्त केला आहे.
नेट परीक्षेचे केंद्र नाशिकला ५ नोव्हेंबर रोजी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST