शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 00:07 IST

नितीन गायकवाड विंचूर : कोरोनाची बाधा झाल्यावर अऩेकजणांची भीतीने तारांबळ उडते. मात्र, मानसिक स्वास्थाच्या बळावर अनेकजण कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे ...

ठळक मुद्देवृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात : घरच्या घरी उपचार करून दिले तोंड

नितीन गायकवाडविंचूर : कोरोनाची बाधा झाल्यावर अऩेकजणांची भीतीने तारांबळ उडते. मात्र, मानसिक स्वास्थाच्या बळावर अनेकजण कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे ताजी असतानाच निफाड तालुक्यातील चांगदेवराव शिंदे (७२) व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे (६६) या शेतकरी दाम्पत्याने चौदा व सोळा स्कोअर पातळी असताना घरच्या घरी उपचार करून कोरोना आजाराने खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे.निफाड तालुक्याच्या पूर्वकडील गोंदेगाव गावात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. एकीकडे बाधित रुग्णांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे गावातीलच वयोवृद्ध दाम्पत्याने कोरोनावर यशस्वी मात करत सकारात्मक संदेश दिला आहे. सध्या या दाम्पत्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. चांगदेवराव शिंदे व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे (६६) या दाम्पत्याला कोरोनासदृश्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांचा मुलगा शिवाजी शिंदे यांनी प्रथम उपचार म्हणून गावातच स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. सलाईन व गोळ्या घेतल्यानंतरही शिंदे यांना काही फरक जाणवला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी लासलगाव येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले असता, त्यांनी कोविड टेस्ट करण्यासाठी सांगितले. त्यानंतर शिंदे दाम्पत्याची कोविड चाचणी केली असता कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. एचआरसीटी तपासणीत चांगदेवराव शिंदे यांचा स्कोअर १४ व गयाबाई शिंदे यांचा स्कोअर १६ असल्याचे निदान झाल्याने त्यांनी येवला येथेच ॲॅडमिट करण्यासाठी हॉस्पिटलचे शोधाशोध केली. मात्र, स्कोअर पातळी जास्त असल्याने त्यांना कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. त्यांना ऑक्सिजन बेडची गरज असल्याचे सांगण्यात आले. विंचूर, लासलगाव, निफाड, पिंपळगाव, नाशिक येथील हॉस्पिटलला चौकशी केली. मात्र, त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. वय जास्त असल्याने कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घेतले गेले नाही. यानंतर शिंदे कुटुंबीयांनी घरीच उपचार घेण्याचे ठरविले.सकारात्मक जीवनशैलीयेवला येथील डॉक्टर गायकवाड यांनी दिलेल्या गोळ्या औषधे घेऊन तसेच दररोज सकाळ-संध्याकाळ काढा, सकाळी गरम पाणी, वाफ व सकारात्मक जीवनशैली ठेवून जिगरबाज दाम्पत्याने अखेर कोरोनावर मात केली असून यातून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. याशिवाय त्यांचे लाखो रुपये देखील वाचले असून, ते पूर्वीप्रमाणेच शेतीची कामे करत आहेत. त्यांना ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटरची गरज भासली. शरीराबरोबरच मनही कणखर असल्याचे दाखवून देत सकारात्मक विचार ठेवल्यास कोरोनावर सहजतेने मात करता येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.असा होता दिनक्रम...सकाळ संध्याकाळ काढा. सकाळी गरम पाणी व वाफ. सकाळी नाष्ट्यात दोन अंडी. कोरा चहा. अकरा वाजता पोटभर जेवण. त्यानंतर झोप. दुपारी तीनला फळे. थोडेफार शेतीची कामे, पाच वाजता चहा. दोन अंडी. संध्याकाळी सहा वाजता पुन्हा काढा व रात्री ८.३० ला जेवण असा दिनक्रम त्यांनी ठेवला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य