नाशिक शहरातील पंचवटी भागातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असलेल्या श्री काळाराम मंदिरात शनिवारी रात्री सगळे दिवे बंद करण्यात येऊन समईच्या प्रकाशात शेजारती करण्यात आली. समईच्या प्रकाशात मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. श्री काळाराम संस्थानचे माजी विश्वस्त तथा पुजाधिकारी सुशील पुजारी यांनी खास ‘लोकमत’साठी हे छायाचित्र उपलब्ध करून दिले आहे.
समईच्या प्रकाशात शेजारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 02:06 IST