शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संस्कारासाठी नको धाकाचा बडगा; स्मार्ट बनलेल्या मुलांना हवा ‘प्रेम-जिव्हाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:21 IST

आजच्या इंटरनेट युगातील स्मार्ट मुलांना आणखी ओव्हरस्मार्ट बनविण्यासाठी सर्व काही मिळते तरीही मुले विचित्र वागतात, अशी तक्रार अनेक पालक करतात. परंतु आधीच ‘स्मार्ट’ असलेल्या मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी पालकांनी आपला अमूल्य वेळ द्यायला हवा, तसेच शिस्त हवीच पण उगीच धाकाचा बडगा दाखवायला नको, असे मत बालमानसतज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केले

ठळक मुद्देशिस्त हवीच पण उगीच धाकाचा बडगा दाखवायला नकोमल्टिमीडिया इंटरनेट या माध्यमातून मुलांना सखोल अभ्यासाची सवय लागू शकते, आजच्या काळातील मुले केवळ स्मार्टच नव्हे तर ओव्हरस्मार्ट

मुकुंद बाविस्कर नाशिक : आजच्या इंटरनेट युगातील स्मार्ट मुलांना आणखी ओव्हरस्मार्ट बनविण्यासाठी सर्व काही मिळते तरीही मुले विचित्र वागतात, अशी तक्रार अनेक पालक करतात. परंतु आधीच ‘स्मार्ट’ असलेल्या मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी पालकांनी आपला अमूल्य वेळ द्यायला हवा, तसेच शिस्त हवीच पण उगीच धाकाचा बडगा दाखवायला नको, असे मत बालमानसतज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केले किंबहुना मल्टिमीडिया इंटरनेट या माध्यमातून मुलांना सखोल अभ्यासाची सवय लागू शकते, असे मतही बालशिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.सर्व अत्याधुनिक सुखसुविधांनीयुक्त अशी आजच्या काळातील मुले केवळ स्मार्टच नव्हे तर ओव्हरस्मार्ट झाली आहे, असे म्हटले जाते. त्यामुळेच पालक आणि शिक्षकांची मुलांवरील सर्वच बाबतीतील जबाबदारी आणखी वाढली आहे. यासंदर्भात बालमनोविकारातज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांनी स्पष्ट केले की, आजच्या काळात पालकांसाठी टीव्ही चॅनल्स, मोबाइल, इंटरनेट आणि अन्य संपर्क माध्यमे अत्यावश्यक गोष्ट बनलेली असल्याने मुलांना त्यापासून दूर ठेवणे अवघड आहे. उलट वैयक्तिक संगणक हा मुलांचा योग्य मार्गदर्शक बनू शकतो. तसेच त्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करू शकतो. ज्ञानाचा अथांग सागर घरात बसल्या बसल्या मुलांना बघायला मिळतो. त्यामुळे मोबाइल, संगणक, इंटरनेट, लॅपटॉप, टॅब अशा अत्याधुनिक साधनांनी मुलांच्या जीवनात फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अर्थात इंटरनेटचे काही तोटे आहेत, परंतु योग्य मार्गाने वापर केल्यास फारच फायदेशीर व चांगला मित्र म्हणून भूमिका बजावू शकतो. यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांची जबाबदारी वाढली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. अत्याधुनिक साधनांबरोबर हवे खेळआपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास व योग्य संस्कार होण्यासाठी पालकांनी पुरेसा वेळ द्यायला हवा, तसेच इलेक्ट्रॉनिक्स गॅझेजसचा योग्य तेव्हाच वापर व्हावा, मुलांनी पालकांशी, मित्रांशी गप्पा मारव्यात, खेळ खेळावेत, पुस्तकांशी मैत्री करावीे.- डॉ. उमेश नागापूरकर,  बाल मनोविकासतज्ज्ञ मुलांसाठी एक तास द्याआज-कालच्या पालकांना वेळ नाही बºयाच पालकांशी चर्चा करताना जाणवते की, मुलांना ते अर्धा ते एक ताससुद्धा वेळ देऊ शकत नाही. याची कारणे असंख्य असतात. तरीही मुलांच्या योग्य वाढीसाठी पालकांनी किमान एक तास मुलांना द्यावा.- देवेंद्र ठाकरे,  मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल व्यावहारिक बंध नको, हवा प्रेमाचा सेतूआजच्या काळातील मुले ही बुद्धिमान आहेत, तसेच जिज्ञासू असून चुणचुणीत आहेत. पालक आपल्या मुलाच्या सुखासाठी म्हणजे त्याने सर्व क्षेत्रात पुढे जावे म्हणून धडपड करतात, त्याला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ‘तू अमुक केले की तुला तमुक घेऊन देईल’ असा व्यवहार सुरू होतो. मग बालपणापासून मुले हट्टी होतात. व्यावहारिक होतात. मग एखादी गोष्ट मिळाली नाही तर दुखी होतात, निराश होतात. त्यासाठी मुलांना प्रेमाने समजावून सांगत यायला हवे, त्यासाठी प्रेमाचे बंध दृढ व्हावेत, अधिक घट्ट व्हावेत. - डॉ. शामा कुलकर्णी, बालमानसतज्ज्ञ

टॅग्स :doctorडॉक्टर