शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्ये पाणी मुरविणे काळाची गरज : सुनील कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:18 IST

भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी सच्छिंद्र शहरे तयार करणे, ही भारताची नजिकच्या काळात गरज बनणार आहे, असे आग्रही प्रतिपादन जलअभ्यासक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी केले.

नाशिक : भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी सच्छिंद्र शहरे तयार करणे, ही भारताची नजिकच्या काळात गरज बनणार आहे, असे आग्रही प्रतिपादन जलअभ्यासक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी केले. जलजागृती सप्ताह २00८ निमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जलपूजन आणि ग्रंथपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी अधीक्षक अभियंता व प्रशासक राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. कुटे म्हणाले की, आपण भारतीयांनी आपल्याकडील फड बंधाऱ्यांसारखा १६00 वर्षे जुना वारसा जपायला हवा होता. शिवाय स्पंजासिटीसारख्या आधुनिक मार्गांनी भूगर्भातील पाणीस्तर उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत, असेही आवाहन कुटे यांनी करून चीन, अमेरिका, श्रीलंका, फिलिपाईन्स या देशांमधील पाण्याची काटकसर, पाण्याचा पुनर्वापर याविषयी माहिती दिली. व्याख्यानास जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांचा गौरवजलजागृती कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धा विजेते- शालेय गट- श्रेया सिंगल आणि हिरल मुथा (प्रथम), स्वराली भागवत (द्वितीय). खुला गट- संतोष भागवत (प्रथम), प्रियंका ढोमणे (द्वितीय), तृतीय प्रांजली चंद्रात्रे. चित्रकला स्पर्धा- शालेय गट- सृष्टी नेरकर प्रथम, कोमल धुमणे द्वितीय, स्वयम चिखलीकर तृतीय, यश चांदसरे उत्तेजनार्थ. खुला गट- जयश्री ससाणे (द्वितीय).

टॅग्स :Waterपाणी