शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:09 PM2020-02-12T23:09:32+5:302020-02-12T23:49:21+5:30

नाशिक : मूल्यवर्धन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकवायचे आहे. जे भविष्यात स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीने समाजात वागतील, वावरतील अशी ...

The need to teach a life beyond education | शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकविण्याची गरज

महाराष्टÑ शासन शालेय शिक्षण विभाग व शांतिलाल मुथा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याचा दीपप्रज्वलन करून शुभारंभ करताना राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी. समवेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटरमण, शांतिलाल मुथा, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख नंदकिशोर साखला, जिल्हा शिक्षणाधिकारी वैशाली झनकर आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देविशाल सोळंकी : मूल्यवर्धन जिल्हा मेळावा उत्साहात

नाशिक : मूल्यवर्धन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकवायचे आहे. जे भविष्यात स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीने समाजात वागतील, वावरतील अशी पिढी आपल्याला घडवायची आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले.
महाराष्टÑ शासन शालेय शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कालिदास कलामंदिरात आयोजित मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधकृष्ण गमे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, शांतिलाल मुथा फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथा, जिल्हा शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख नंदकिशोर साखला, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.
विशाल सोळंकी म्हणाले, दीडशे वर्षात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुमारे ६ कोटी लोकांनी बलिदान दिले. आपण सर्व स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो असल्याने आपल्याला सर्व मोफत मिळाले आहे. यासाठी आपण भावी पिढीला चांगली मूल्ये देऊ शकलो आणि ही मूल्ये घेऊन विद्यार्थी आयुष्यात पुढे गेले तर आपल्या कार्याला खऱ्याअर्थाने अर्थ प्राप्त होईल. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शांतिलाल मुथा यांच्या कार्याचा गौरव करून मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकातील मुलांना याचा फायदा देण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांचेही यावेळी भाषण झाले.
प्रारंभी मूल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जिल्हा मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख नंदकिशोर साखला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात शांतिलाल मुथा यांनी मूल्यवर्धनचा प्रवास कथन केला. मेळाव्यास जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक चोपडा, यतीश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रह्मेचा, चंद्रशेखर चोरडिया, जगन्नाथ सोनटक्के, अशोक पवार, भाऊसाहेब शेळके, हनुमान शिकारे, सुकन्या भामरे आदींनी परिश्रम घेतले.

८००च्या वर पोस्टर्स प्रदर्शित
मूल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनात मूल्यवर्धन शिक्षकांनी बनविलेले ८०० च्या वर पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. कालिदास कलामंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत दि. १४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शालेय विद्यार्थी, पालकांना प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

Web Title: The need to teach a life beyond education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.