शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

केंद्रातील मोदी सरकारला रोखण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:20 AM

फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ राफेल खरेदी घोटाळ्याबाबत पंतप्रधान मोदी संसदेत कोणताही स्वरूपाचा खुलासा करीत नाहीत़ त्यामुळे या हुकूमशाही सरकारला जाब विचारण्याची तसेच सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़ 

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण : जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ राफेल खरेदी घोटाळ्याबाबत पंतप्रधान मोदी संसदेत कोणताही स्वरूपाचा खुलासा करीत नाहीत़ त्यामुळे या हुकूमशाही सरकारला जाब विचारण्याची तसेच सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़ केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफे ल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल - डिझेलचे वाढलेले भाव, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात मंगळवारी (दि़११) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते़ महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले़यावेळी मोर्चेकऱ्यांनी भाजपा सरकार विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण