शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:22 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आहे.

सातपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असून, घरात शौचालय असून वापरता येत नसल्याने कुटुंबीयांची फरफट होत आहे.महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलून मोठ्या व्यासाची पाइपलाइन टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषत: सातपूर बसस्टँडच्या आवाराचा शौचालयासाठी वापर केला जात होता. यात वयोवृद्ध महिला, तरु णी यांची मोठी हेळसांड होत होती. महादेवनगरात शौचालय उभारणीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. महानगरपालिकेने या वसाहतीत हागणदारीमुक्त योजनादेखील राबविली होती. शौचालयासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने अनेक वेळा अपघातदेखील झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, महानगरपालिकेने एका कोपऱ्यात सुलभ शौचालय उभारून दिलेले आहे. पैसे देऊन या शौचालयाचा वापर करावा लागत असल्याचे रामेश्वर गायकवाड यांचे म्हणणे आहे.या भूमिगत गटारी फार पूर्वीच्या आणि कमी व्यासाच्या पाइपलाइन असल्याने तुंबण्याचे प्रमाण वाढले. गटारी तुंबू लागल्याने घरात दुर्गंधी पसरू लागली. परिणामी घरात शौचालय असून, वापरता येणे अवघड झाले आहे. म्हणून काहींनी पुन्हा उघड्यावर जाणे पसंत केले आहे. अन्यथा पैसे देऊन सुलभ शौचालयाचा वापर करावा लागत आहे. काही लोकांना प्रत्येकवेळी पैसे देणे परवडत नाही. जुन्या झालेल्या भूमिगत पाइपलाइन बदलण्याची मागणी उषा खरात, बाळू खैरे यांनी केली आहे.या भागात नंदिनी नदीकाठी अनेक वर्षांपूर्वी दोन ठिकाणी महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय उभारलेले आहेत. परंतु या शौचालयांची देखील मोडतोड झाल्याने साफसफाई अभावी कोणीही वापर करीत नसल्याचे आयेशा शेख, कल्पना सोनवणे यांचे म्हणणे आहे. प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वसाहतीतील पथदीपांवरील बल्बचा उजेड फारच कमी पडत असल्याने एलइडी बल्ब बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या भागात तत्कालीन नगरसेवक अ‍ॅड. वसुधा कराड यांच्या नगरसेवक निधीतून समाजमंदिर उभारण्यात आलेले आहे. या समाजमंदिराचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. लाखो रु पये खर्चून बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचा वापर गर्दुल्यांसाठी आणि शौचालयासाठी होत असल्याचे धोंडिबा गायकवाड यांनी सांगितले़ चढ-उतार असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. उतार असलेल्या भागात मुबलक पाणी मिळते, तर चढ असलेल्या भागात पाणी मिळत नाही. डास फवारणीसाठी कोणीही कर्मचारी या भागात फिरकत नसल्याची तक्रार मुरलीधर चव्हाण यांनी केली आहे.वसाहतीत मुख्य समस्या शौचालयाचीनाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर गावालगत प्रभाग क्र मांक ११ मध्ये महादेवनगर वसाहत आहे.जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतीतील संपूर्ण रस्ते सीमेंट काँक्र ीटचे बनविण्यात आलेलेआहेत. तरीही काही समस्या अजूनही मूळ धरून आहेत. या वसाहतीत मूळ समस्या शौचालयाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत होते. त्यामुळे शौचालयाची मागणी करण्यात येत आहे.केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घराघरांमध्ये शौचालयांची योजना आणली. महानगरपालिकेने महादेवनगरात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. येथील नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. घरात शौचालय आले खरे, पण आउटलेटची सोय मात्र करण्यात आली नाही. म्हणून नागरिकांनी भूमिगत असलेल्या सांडपाण्याच्या गटारी या शौचालयांचे आउटलेट जोडून घेतले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक