शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना दंड करण्याची गरज :  सतीश कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:06 IST

शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे,

नाशिक : शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, याचा पुनरुच्चार वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. नागरिकांना दंड करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर कुलकर्णी यांनी समितीला पत्र दिले असून, निर्णयाचा फेरविचार करा, असा सल्ला दिला आहे.  नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, आता ही संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. महापालिकेच्या वतीने यासंदर्भात डास निर्मूलनाची कार्यवाही केली जाते परंतु तरीही डेंग्यूू रुग्ण आढळल्यानंतर नागरिक महापालिकेकडे तक्रार करतात. वस्तुत: नागरिकांच्या तक्रारीवरून परिसराची तपासणी केली असता संबंधित नागरिक किंवा त्यांच्या घराच्या आसपास नागरिकांच्या घरातच फ्रीज, पाणीसाठा, फुलदाण्यात, झाडांच्या कुंड्या यामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडतात. जे नागरिक स्वत: दक्षता घेतात, त्यांना अन्य निष्काळजी नागरिकांमुळे रोगराईला सामोरे जावे लागते. त्यामुळे डेंग्यूचे डास आढळतील अशा नागरिकांना दंड करण्याची मागणी सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य समितीत केली होती.  प्रशासनाने याबाबत प्रति डास उत्पतीस्थानासाठी पाचशे रुपयांचा दंड करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला होता. मात्र समितीने प्रशासनावर दोषारोप करीत हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांना पत्र पाठविले असून, दंड करण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मगणी केली आहे.पेस्ट कंट्रोल ठेक्याचा फेरविचार करावापेस्ट कंट्रोलचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून बेजाबबदारपणे काम होत असून, त्याचादेखील विचार करावा, असे कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनादेखील कुलकर्णी यांनी पत्र दिले असून, सध्या हिवताप निर्मूलन विभागात अपुरे कर्मचारी असून, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी भरून कामकाज करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यू