शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:05 AM

दोन विद्यापीठे आणि आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळा तसेच महाविद्यालयांची संख्या मोठी असतानाही शासकीय स्तरावर मात्र नाशिकची उपेक्षा झाली आहे. उत्तर महाराष्टÑाची राजधानी मानल्या जाणाºया नाशिकमध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने मात्र तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांचे दरवर्षी हाल वाढत आहेत. एकतर पुणे किंवा जळगाव असे पर्याय निवडावे लागत असल्याने आता स्थानिक स्तरावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी राज्यातील सरकार नाशिकला न्याय देणार काय, हा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.

साहेबराव अहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाथर्डी फाटा : दोन विद्यापीठे आणि आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळा तसेच महाविद्यालयांची संख्या मोठी असतानाही शासकीय स्तरावर मात्र नाशिकची उपेक्षा झाली आहे. उत्तर महाराष्टÑाची राजधानी मानल्या जाणाºया नाशिकमध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने मात्र तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांचे दरवर्षी हाल वाढत आहेत. एकतर पुणे किंवा जळगाव असे पर्याय निवडावे लागत असल्याने आता स्थानिक स्तरावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी राज्यातील सरकार नाशिकला न्याय देणार काय, हा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.  सुवर्णत्रिकोणातील नाशिक हे उत्तर महाराष्टÑाचे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शैक्षणिकदृष्ट्या मात्र शासनाकडून नाशिकला पुरेसा न्याय मिळाला नसल्याची भावना आहे. शासकीय महाविद्यालये मिळवण्यात नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगाव या दुय्यम शहरांनी मात्र आजवर बाजी मारल्याचे दिसते. धुळे आणि जळगावला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणजेच शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय १९६० मध्ये सुरू करण्यात आले. नाशिकला मात्र गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सुरू व्हायला १९८० साल उजडावे लागले. नाशिकला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू झाल्यानंतर १९८९ पासून विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे कार्यालय सुरू झाले. त्याअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील २८ इंजिनिअरिंग पदवी, फॉर्मसी, मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक शिक्षणक्र मांचे प्रशासकीय नियंत्रण केले जाते. असे असूनही नाशिकला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय न देता युती शासनाच्या काळात ते १९९६ मध्ये जळगाव जिल्ह्यास देण्यात आले.  विभागाला एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जिल्ह्याला एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक व तालुक्याला एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असावे, असे साधारण सरकारचे धोरण असल्याचे विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभागीय सहसंचालक डॉ. ज्ञानदेव नाठे यांचे म्हणणे आहे. मग तंत्रशिक्षण विभागाचे पाच जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय नाशिकला आहे. तर अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिकला का नको, असा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.  नाशिकला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांना बारावीनंतर व डिप्लोमानंतर गुणवत्ता सिद्ध करूनही एकतर पुणे येथील महाविद्यालयात प्रवेशासाठी तिथल्याही विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते किंवा जळगावचा पर्याय स्वीकारावा लागतो अथवा फी, डोनेशन भरून खासगी महाविद्यालयांमध्ये नाइलाजाने प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळेच नाशिकमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची गरज अधिक भासू लागली आहे. यासंदर्भात पश्चिम नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.