शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज : रंजाना भानसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 18:33 IST

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनतरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरजजागतिक युवा कौशल्य दिन सोहळ्यात महापौरांचे प्रतिपादन

नाशिक : कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिकमधील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्थातर्फे जिल्हा नियोजन भवन येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य मार्गदर्शन व सन्मान सोहळयात त्या बोलत होते.व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनिल सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राचे उप महाव्यवस्थापक जितेंद्र कामठीकर, कौशल्य विकास अधिकारी अशोक चव्हाण, बाळासाहेब जाधव, सागर भाबड आदी उपस्थित होते. यावेळी आमदार फरांदे यांनी देशाची वाढती लोकसंख्या ही देशाची ताकद असल्याचे सांगतानाच आगामी काळात भारत हा मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ असणारा देश असेल, असा विश्वास व्यक्त केला. तर देशातील लोकसंख्येच्या ६० टक्के असलेल्या तरु णांमध्ये भविष्यातील भारत घडविण्याचे सामर्थ्य असल्याचे सांगतानाच कौशल्यनिपूण तरु णांनी प्रशिक्षण घेवून स्वयंरोजगार सुरू करावा असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केले. दरम्यान, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक रोजगार मिळवून देणाऱ्या संस्था आणि रोजगार प्रोत्साहन योजनेत रोजगारक्षम प्रशिक्षणाचा जास्त लाभ देणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

कौशल्य विकास जनजागृती फेरी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिकमधील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्थातर्फे शहरातून कालिदास कलामंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कौशल्य विकास जनजागृती रॅली काढण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ‘यंग इंडिया, स्कील इंडिया’, कौशल्यनिपुन महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट आदि घोषणा देत जनजागृती रॅलीत सहभाग घेतला. 

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयMLAआमदारDevyani Farandeदेवयानी फरांदे