शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कट प्रॅक्टीस विरोधी कायद्यापेक्षा शासकिय आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज: शाम अष्टेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

अशाप्रकारच्या कायद्यांनी काही फरक पडणार नाही. मुळातच कायदा केल्याने व्यवस्था सुधारू शकते. परंतु प्रवृत्ती नाही असे मला वाटते. जर एखाद्या माणसाची सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणार, त्यापेक्षा सरकारने अन्य पर्याय शोधले पाहिजे.

ठळक मुद्दे सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणारसरकारच्या आरोग्य सेवा सक्षम झाल्या पाहिजेत.

नाशिक- आरेग्य क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे आणि ग्रामीण आरोग्य सेवेचा गाढा अभ्यास असलेले डॉ. शाम विनायक अष्टेकर हे महाराष्टÑाला सुपरिचीत आहेत वीस वर्षाहून अधिक काळ त्यांचा शेतकरी संघटनेशी संबंध राहीला आहे. बीजे मेडीकलमधून एम डी पदवी घेतल्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा समितीवर देखील काम केले आहे. इंग्लड आणि जर्मनीत त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत. तसेच चीन आणि फिलीपाईन्स भारतात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील आरोग्य सेवेवर त्यांचा अभ्यास आहे. राज्य सरकारच्या वतीने कट प्रॅक्टीस विरोधी कायदा करण्यात येणार असून त्यासंदर्भात त्यांनी परखड मते व्यक्त केली.प्रश्न- राज्य सरकारच्या वतीने वैद्यकिय व्यवसायिकांच्या कट प्रॅक्टीस विरोधी कायदा बनवण्याच्या प्रयत्नाबद्दल काय वाटते?अष्टेकर: मला वाटते अशाप्रकारच्या कायद्यांनी काही फरक पडणार नाही. मुळातच कायदा केल्याने व्यवस्था सुधारू शकते. परंतु प्रवृत्ती नाही असे मला वाटते. जर एखाद्या माणसाची सवयच वेगळी असेल तर त्याला कायदा काय करणार, त्यापेक्षा सरकारने अन्य पर्याय शोधले पाहिजे.प्रश्न: मग, शासनाने काय केले पाहिजे असे वाटते?अष्टेकर: मुळात रूग्ण हे शासकिय आरोग्य केंद्रांकडे गेले पाहिजेत. त्यासाठी आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. सध्या केंद्र ्रसरकारने आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री आरोग्य विमान या दोन चांगल्या योजना आणल्या आहेत त्यातून आजारपणातील गणित जमले की मग खासगी सेवेकडे जाण्याची गरज पडणार नाही, असे वाटते.प्रश्न: सरकारच्या आरोग्य सेवेविषयी काय मत आहे.अष्टेकर: सरकारच्या आरोग्य सेवा सक्षम झाल्या पाहिजेत. तसेच त्यात पारदर्शकता आली पाहिजेत. राज्य आणि केंद्राने काही जुन्या योजनांची नावे बदलली असली तरी आरोग्य विम्याच्या किंवा भरपाईच्या योजना चांगल्या आहेत. मुळात जर एखादे काम एक लाख रूपयांच्या आरोग्य विम्यात होत असेल तर आकारण कोणी खासगी व्यवसायिकांकडे जाणे शक्यच नाही. त्यावरच भर दिला पाहिजे. शासकिय आरोग्य सेवा सक्षम झाल्या तर कोणी खासगी सेवेकडे वळणार नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारMedicalवैद्यकीयHealthआरोग्यdocterडॉक्टर