शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची गरज : शाहू खैरे

By संजय पाठक | Updated: July 20, 2019 23:57 IST

नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोकप्रतिनिधीदेखील अंधारात असतील तर कंपनीचा काय उपयोग? असा प्रश्न करीत महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देएकही प्रकल्प निर्दोेष नाहीमहापालिकेला विश्वासात घेतले जाणार नसेल तर काय उपयोग

नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिकस्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोकप्रतिनिधीदेखील अंधारात असतील तर कंपनीचा काय उपयोग? असा प्रश्न करीत महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.प्रश्न : स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेने स्थापन केली असताना ती बरखास्त करावी ही टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय?खैरे : महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यानंतर खरे तर सर्वच कामे वेगाने होण्याची गरज होती. परंतु कंपनीचा कारभार अत्यंत वादग्रस्त आहे. कंपनीच्या मार्फत शहरात जेवढी कामे घेण्यात आली त्यातील एक काम धड नाही. महाकवी कालिदास कलामंदिर असो अथवा कलादालन असो स्मार्ट रोडचे रेंगाळालेले काम आणि त्यातील उणिवा या सर्व बघतच आहात. आता त्या स्मार्ट पार्किंगचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेला याबाबत माहिती नाही की नागरिकांना संचालक अंधारात असतात. शेवटी हे सर्व शहरासाठी असेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून कामे योग्य पद्धतीने होत नसेल तर काय करणार?प्रश्न : स्मार्ट सिटीच्या नक्की कोणत्या कामांबाबत तक्रार आहे.खैरे : कंपनीचे संचालक म्हणून यापूर्वी अनेक विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत मुद्दे मांडले आहेत. सर्वच कामे वादग्रस्त आहेत. एक किलोमीटरचा एक रस्ता गेल्या दोन वर्षांत पूर्ण होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात भुयारी गटारच धरलेले नाही. त्याचा दर्जा योग्य नाही. वेळेत कामही पूर्ण झालेलेले नाही, परंतु ठेकेदारावर काय कारवाई झाली? उलट ठेकेदाराला चार कोटी रुपये वाढीव देण्याचा निर्णय झाला. फुले कलादालनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा काही भाग खाली आला. तरीही आठ महिन्यांपूर्वी हस्तांतरित झालेल्या या कलादालनासाठी आता पन्नास लाख रुपये सुधारित प्राकलन दिले जात आहे. नेहरू उद्यानाचे सुशोभिकरण म्हणजे नक्की काय झाले हे बघून घ्या. गावठाण भागात एक काम झालेले नाही. परंतु स्काडा मीटर खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोळ करण्याचा घाट उघड झाला, अशी अनेक कामे आहेत. परंतु त्याबाबत माहिती दिली जात नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी