शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या मालकी हक्कासाठी लढा उभारण्याची गरज : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:45 IST

शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.

नाशिक : शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतक-यांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले.शेतकरी संघटनेच्या वतीने ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या व्यक्तिचरित्राच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि.८) विशाखा सभागृहात करण्यात आले. यावेळी झगडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दौलतराव घुमरे होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, शेतकरी संघटनेचे रामचंद्रबापू पाटील, आत्मचरित्राचे लेखक भानू काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी झगडे म्हणाले, देशात व राज्यात उपयोगिता संपलेले काही कायदे असून, उदासीन प्रशासकीय व्यवस्थेमुळे शेतकºयांना न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागतात. स्वातंत्र्यानंतरही शेतकरी रस्त्यावर उतरून न्यायहक्कासाठी संघर्ष करताना दिसतो, हे दुर्दैवी आहे. अधिकाºयांना संरक्षण दिले जाते आणि शेतकरी वाºयावर सोडला जातो, अशी परखड टीका झगडे यांनी यावेळी केली. भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या लोकआंदोलनाचा धांडोळा घेत त्यांचे त्याग, समर्पण व लढ्याची नोंद व्हावी, या उद्देशाने लिखाणाची जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. परिचय मिलिंद जहागिरदार व अ‍ॅड. नानासाहेब जाधव यांनी करून दिला.व्यवस्था बदलाची गरजशेती, शेतकरी आणि चळवळ वाचविण्यासाठी व्यवस्था बदलाची गरज आहे, असे मत लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. जोशी यांनी व्यवस्था व ती राबविणाºया लोकांच्या वृत्तीचा अभ्यास करून चळवळ उभी केली. मात्र अलीकडे चळवळीच्या नावाखाली व्यवस्थेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसून येतो, यामुळे चळवळी दुबळ्या होतात. शेती व शेतकºयांची अवस्था बदलायची असेल तर व्यवस्थाच बदलावी लागेल असे ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी